भारतीय महाविद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती संपन्न

0
453
Google search engine
Google search engine

अमरावती प्रतिनिधी :-

भारतीय विद्या मंदिरद्वारा संचालित भारतीय महाविद्यालय अमरावती येथे राष्ट्रीय सेवा योजना द्वारा सावित्रीबाई फुले जयंती संपन्न झाली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर आराधना वैद्य, प्रमुख उपस्थिती डॉ. अलका गायकवाड, डॉ.शर्मिष्ठा कुळकर्णी, डॉ.संगीता देशमुख, डॉ. मंगला धोरण,डॉ. स्नेहा जोशी,डॉ. विजय भांगे,डॉ. प्रशांत विघे, कार्यक्रम अधिकारी, राष्ट्रीय सेवा योजना प्रा.पंडित काळे उपस्थित होते.
सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले
याप्रसंगी प्राचार्य डॉ. आराधना वैद्य , म्हणाले की, सावित्रीबाईं ज्योतिबा फुले या प्रथम महिला शिक्षिका,समाजकार्य,कवित्री असा त्यांचा प्रवास आहे. ज्योतिबा फुले यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये अतुलनीय कामगिरी केली. त्यामुळे या महापुरुषांची नावे सतत स्मरणात राहत असल्याचे प्रतिपादन केले.
या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयम् सेवक ज्ञानेश्वरी वानखडे, मेघा नागतोड़े, प्रतीक्षा दारोकर, पल्लवी गेडाम, पायल हुकरे, हर्षीता धाबालिया, वैष्णवी पेटकर, अवंतिका शिंदे, काजल वैद्य, श्रद्धा पुरोहीत, अवंतीका शिंदे, वैष्णवी दातीर,आकांक्षा बुटले, जितेंद्र क्षिरसागर, सौरभ लाजूरकर, पवन वैद्य,सौरभ इंगले, पवन वैद्य, अनिकेत डोलारकर, अभय जाधव, कुणाल बासोद, ऋषभ खोडे, प्रतीक वेलुकर,वेदांत कावरे, दीप आगलेक आदी स्वयंमसेवकांनी सहभाग दर्शविला.