अमरावती जिल्हा ब्रेकिंग :- खळबळजनक! विवाहित प्रेमीयुगुलाची धारदार चायना चाकूने गळा चिरत, पोटात वार करून आत्महत्या

0
21873
Google search engine
Google search engine

अमरावती / महाराष्ट्र :-विदर्भ 24 न्यूज डेस्क

 

परतवाडा / अचलपूर :-

अचलपूर,
परतवाडा पोलिस स्टेशनच्या हद्दीत येणार्‍या येणी पांढरी येथील शेतशिवारात बुधवारी दुपारी विवाहीत प्रेमीयुगुलाचे married couple मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यांची आत्महत्या आहे कि हत्या हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मिळालेल्या माहितीनुसार, परतवाडा पोलिस स्टेशन अंतर्गत येणार्‍या कांडली ग्रामपंचायत हद्दीतील वनश्री कॉलनी येथील रहिवासी सुधीर रामदास बोबडे ( 48 ) व एक महिला दोघेही सोमवारी दुपार पासून बेपत्ता होते. त्यांची शोधाशोध सुरू होती. त्यांच्या प्रेमसंबध होते, अशी माहिती आहे. दरम्यान बुधवारी येणी पांढरी येथील राकेश अग्रवाल यांच्या शेतशिवारात दोघांचेही मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत मिळाले.

माहिती मिळताच परतवाडा पोलिस स्टेशनच्या कर्मचार्‍यांनी लगेच घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. तेथे दोघांचे मोबाईल, पर्स, चायना चाकू व इतर साहित्य आढळले. प्रथमदर्शनी दोघांनी आत्महत्या married couple केल्याचे निदर्शनास येते. पण, ते अद्याप स्पष्ट झालेले नाही. महिलेच्या गळ्यावर व पोटावर तर सुधीर याच्या गळ्यावर चायना चाकूचे वार होते. सुधीर हा कविठा स्टॉप येथे पानटपरीचा व्यवसाय करित होता व त्याला दोन मुले आहेत तर महिलेला एक मुलगा व एक मुलगी आहे. दोघेही विवाहित असून त्यांची हत्या की आत्महत्या या चर्चेला पेव फुटले आहे . पोलिस तपासानंतरच या घटनेच्या पाठीमागचे कारण उलगडेल असे पोलिसांनी सांगितले. उपविभागीय पोलिस अधिकारी हसन गौहर यांच्या मार्गदर्शनाखाली परतवाडा पोलिस स्टेशनचे ठाणेदार संतोष ताले व परतवाडा पोलिस यांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे. या घटनेची संपूर्ण तालुक्यात जोरदार चर्चा सुरू आहे.

 

 

दोघेही विवाहित

सुधीर बोबडे याचा कांडली कविठा मार्गावर पान टपरी चा व्यवसाय आहे तर अलका दोडके या गृहिणी होत्या. दोघांचे वेगळे संसार असून मुलं-बाळं आहेत.

घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत पंचनामा सुरू आहे फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले आहे. त्यानंतर पंचनामा इतर माहिती घेतल्या जाईल गळ्यावर पोटात चाकू वार केल्याचे प्रथम दृष्ट्या दिसत आहे.
– संतोष ताले ठाणेदार परतवाडा