*अमरावती विभागातील युवतींना मिळणार सॉफ्टवेअर प्रशिक्षण* – *जिल्हाधिकारी पवनीत कौर* _प्रबोधिनीत 200 युवतींना 18 महिन्यांचे निवासी प्रशिक्षण_

0
1096
Google search engine
Google search engine

 

अमरावती, दि. ५ : जिल्हा प्रशासन, कौशल्य विकास विभाग आणि नवगुरुकुल फाऊंडेशन फॉर सोशल वेलफेअर यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांमध्ये कौशल्य विकास व रोजगारनिर्मितीसाठी ‘ॲडव्हान्स सॉफ्टवेअर प्रोग्रामिंग डिप्लोमा कोर्स’ सुरू करण्यात येत आहे. अमरावती विभागातील 200 महिलाभगिनींना त्याद्वारे 18 महिन्यांचे निवासी प्रशिक्षण देण्यात येणार आहे, अशी माहिती प्र. विभागीय आयुक्त तथा जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी दिली.

प्रशिक्षणासाठी युवतींची निवड विहित चाचण्यांद्वारे केली जाणार असून, इच्छुकांनी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमातून युवती रोजगारक्षम होऊन त्यांना नोकरीची संधी प्राप्त होईल, असा विश्वास जिल्हाधिकारी श्रीमती कौर यांनी व्यक्त केला.

अमरावती येथील डॉ. पंजाबराव देशमुख प्रशासकीय प्रबोधिनी हे प्रशिक्षणाचे ठिकाण हे असेल. हा कार्यक्रम युवतीना रोजगार देईल कारण अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्यांसाठी 80 टक्के नोकरीची हमी आहे. आम्ही यापूर्वीही असे प्रकल्प प्रायोगिक तत्वावर यशस्वीपणे राबवले आहेत.

अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यातील गरजू युवती व विद्यार्थिनीपर्यंत या उपक्रमाची माहिती पोहोचावी यासाठी सर्वांनी या उपक्रमाचा प्रसार करावा, असे आवाहन श्रीमती कौर यांनी केले आहे.
०००