अमरावती ब्रेकिंग – दडबडशाह बाबा दर्गा डबल मर्डर केस अपडेट :- दोन आरोपींना अटक -LCB अमरावती ग्रामीण पोलिसांची दमदार कामगिरी

0
3176
Google search engine
Google search engine

आरोपी – लक्ष्मण पिंपळे रा.मालखेड ,

दीपक पवार रा. बडनेरा यांना अटक

 

अमरावती :-  पोलीस स्टेशन लोणी येथे अप.क्र. २७१/ २०२२ कलम ३०२ भादंवि अन्वये दाखल गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखा येथील पथके करीत असतांना घटनेच्या अनुषंगाने सर्व बाबींचा बारकाईने व सखोल तपास करीत असतांना गोपनीय माहिती मिळाली की, यातील आरोपी लक्ष्मण गोरख पिंपळे हा मागील बरेच वर्षापासून दडबड शहा दर्गा येथे राहुन काम करीत होता व भाविकांकडून मिळणाऱ्या देणगी मधून आपला उदरनिर्वाह करीत होता. परंतु काही दिवसापुर्वी अनवर शहा अकबर शहा रा. लालखडी, अमरावती हा तेथे नवीन मुजावर म्हणुन देखरेख करीत होता.

लक्ष्मण गोरख पिंपळे याचे काहि दिवसांपूर्वी अनवर बेग याचे सोबत वाद निर्माण झाल्याने अनवर बेग अकबर बेग याने लक्ष्मण गोरख पिंपळे यास तेथे राहण्यास मनाई केली होती. त्यामुळे लक्ष्मण गोरख पिंपळे हा स्वतः माझे मुळगावी निघुन गेला. परंतु लक्ष्मण गोरख पिंपळे याचे मनामध्ये मृतकांविरुद्ध रोष असल्याने त्याने बेलोलपुर येथील राहणारा दिपक पवार याचे मदतीने दडबडशहा येथील मुजावर (पुजारी) अनवर बेग अकबर बेग व तेथेच काम करणारा तोफिफ शेख राजीक शेख यांची सुरा या हत्याराने गळ्यावरुन घाव मारुन हत्या केली. अशी कबुली लक्ष्मण गोरख पिंपळे याने दिल्याने दिपक पवार यास ताब्यात घेवुन सदर दोन्ही आरोपी यांना गुन्हाचे अनुषंगाने पुढील कारवाईकामी पोस्टे लोणी यांचे ताब्यात देण्यात आले.

 

सदरची कार्यवाही मा.पोलीस अधीक्षक श्री अविनाश बारगळ, अपर पोलीस अधीक्षक, शशिकांत सातव, श्री. सुर्यकांत जगदाळे, उपविभागीय पोलीस अधिकारी ग्रामीण यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीणचे पोलीस निरीक्षक तपन कोल्हे यांचे नेतृत्वात सपोनी रामेश्वर धोंडगे, पोउपनि नितीन चुलपार, पोउपनि सुरज सुसतकर, पोउपनि मो. तसलीम व त्यांची पथके, सायबर पोलिस स्टेशनचे सपोनि ईश्वर वर्ग व त्यांचे पथक तसेच पोस्टे लोणी येथील सपोनी मिलींदकुमार धवने व अंमलदार यांनी केली.