*पीएम मित्रा टेक्स्टाईल पार्कचे भुसंपादन, मराठी भाषा विद्यापीठाबाबत उद्या महत्वपूर्ण बैठका *उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अमरावती जिल्हा दौरा*

0
582
Google search engine
Google search engine

 

अमरावती, दि. 9 : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पीएम मित्रा टेक्सटाईल पार्क, मराठी भाषा विद्यापीठ आदी विषयांवरील बैठका व विविध महत्वपूर्ण कार्यक्रम अमरावती येथे उद्या सोमवारी (दि. 10 एप्रिल) होणार आहेत.

त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे : दि. 10 एप्रिलला सकाळी 10 वाजता बेलोरा विमानतळ येथे आगमन व पंचवटी चौकाकडे प्रयाण. सकाळी 10.30 वाजता शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या पुतळ्यास पुष्पचक्र अर्पण, सकाळी 10.40 वाजता शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालयातील नवीन वॉर्डचे उद्घाटन. सकाळी 10.50 वाजता शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या 58 व्या पुण्यतिथी निमित्त कार्यक्रम.

सकाळी 11.45 वाजता शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था येथे आगमन व राखीव. दुपारी 12 वाजता शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेच्या शताब्दी महोत्सवाचा शुभारंभ. दुपारी 1.15 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रयाण. दुपारी 1.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय नवीन इमारतीचा भूमीपूजन सोहळा. दुपारी 1.45 वाजता पीएम मित्रा टेक्सटाईल पार्क अमरावती भुसंपादनाबाबत बैठक. दुपारी 2.15 वाजता मराठी भाषा विद्यापीठाबाबत आढावा बैठक. दुपारी 2.45 वाजता रिध्दपूरकडे प्रयाण. दुपारी 3.30 वाजता रिध्दपूर येथे आगमन व राखीव. दुपारी 4.10 वाजता बेलोरा विमानतळ अमरावतीकडे प्रयाण. सायंकाळी 5.10 वाजता बेलोरा विमानतळ येथे आगमन व मुंबईकडे प्रयाण.

0000