कृष्णा कृषी महाविद्यालयाचे कृषिदूत देणार शेतीचे धडे, चिंचणी गावात स्वागत : शेतकर्‍यांना करणार मार्गदर्शन

Google search engine
Google search engine

 

 

 

सांगली/कडेगांव न्युज:

कृष्णा कृषी महाविद्यालयाचे कृषिदूत देणार शेतीचे धडे,
चिंचणी गावात स्वागत : शेतकर्‍यांना करणार मार्गदर्श

चिंचणी ता. कडेगाव येथे जयवंतराव भोसले कृष्णा कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी ग्रामिण कृषी जागरुता करण्यासाठी दाखल झाले असून आगमनाच्या वेळी त्यांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी माजी सरपंच नंदकुमार माने, ग्रामविकास अधिकारी प्रताप गुटुगडे, सचिन माने शेतकरी ग्रामस्थ उपस्थित होते.
जयवंतराव भोसले कृष्णा कृषी महाविद्यालयाच्या माध्यमातून ग्रामीण कृषी जागरुकता हा कार्यक्रम कृषी दूत राबवणार आहेत.शेतीच्या पीकांच्या दृष्टीने येणाऱ्या समस्या त्यावर उपाय योजना,तसेच जास्त उत्पादन घेण्यासाठी नविन तंत्रज्ञान उच्च जातीच्या बीयांणाचा वापर,फळलागवड आदिंचे मार्गदर्शन शेतकऱ्यांना करण्यात येणार आहे.त्यासाठी कृषी दूत म्हणून ऋषिकेश अर्जुन, गणेश बर्गे,अंकित चव्हाण, रोशन डाखोरे,अथर्व दुबोले आदिंचा सहभाग असणार आहे.
प्राचार्य डॉ. अशोक फरांदे, प्रा. दिपक भिलवडे, प्रा. प्रविण पाटील, प्रा. अमोल आडके यांच्या मार्गदर्शनाखाली कृषिदूत काम करणार आहेत.