नेर्ली गावातील शिंदे वस्ती साकव पुलाचे काम पूर्ण शेतकऱ्यांचा 67 वर्षाचा वनवास संपला.. सरपंच राजाराम शिंदे सरकार

Google search engine
Google search engine

नेर्ली गावातील शिंदे वस्ती साकव पुलाचे काम पूर्ण शेतकऱ्यांचा 67 वर्षाचा वनवास संपला.. सरपंच मा राजाराम शिंदे सरका

 

 

सांगली कडेगांव न्युज:

कडेगांव तालुक्यातील नेर्ली गावातील शिंदे वस्ती येथील ओढ्यावर पूल व्हावा यासाठी परिसरातील शेतकरी बऱ्याच वर्षांपासून लोकप्रतिनिधी कडे मागणी करीत होते, पावसाळ्यात ओढ्याला पाणी असल्यामुळे ओढा ओलांडून शेतात कामाला जाणे येणे बंद होत होते, शेतातील मशागत करण्यासाठी अडचण होत होती, ग्रामपंचायत स्थापन होऊन 67 वर्ष झाली पण शेतकऱ्यांच्या या मागणीकडे कोणीही लक्ष दिले नाही, ग्रामपंचायत निवडणुकीच्यावेळी परिसरातील शेतकऱ्यांनी मा राजाराम शिंदे सरकार यांच्याकडे रस्त्याची अडचण सांगितली होती त्यावेळी मा राजाराम शिंदे सरकार यांनी शब्द दिला होता निवडून आल्यावर सर्वात पहिले पुलाचे काम करून देईल, निवडून आल्यावर रस्ता मंजूर करताना पूल कोणाच्या जमिनीवर बांधायचा हा प्रश्न उभा राहिला, नेर्लीचे लोकनियुक्त सरपंच मा श्री राजाराम शिंदे सरकार यांनी कोणताही विचार न करता स्वतःची 5 गुंठे जागा पुलासाठी व रस्त्यासाठी दिली आणि ताबडतोब अंदाजपत्रक मंजूर करून स्वतः उभे राहून साकव पुलाचे दर्जेदार काम करून घेतले, निवडणुकीत दिलेला शब्द पूर्ण करून वचनपूर्ती केली,याकामी पंचायत समितीचे बांधकाम अभियंता युवराज बाबर यांनी मार्गदर्शन केले, याकामी उपसरपंच मा प्रकाश कांबळे, ग्रामसेवक सुरेंद्र प्रताप,ग्रामपंचायत सदस्य शंकर मुळीक, संजय मोहिते, अभिजित वलेकर सदस्या मुमताज मुजावर, मदिना आगा, सुरेखा लोंढे, गंगुबाई गायकवाड, संजीवनी पवार, नेर्ली सोसायटी चेअरमन चंद्रकांत पाटील,पंचायत समिती सभापती मंगल क्षीरसागर, सिकंदर मुजावर, शिवाजी शिंदे, प्रदीप शिंदे, अक्षय शिंदे, प्रकाश शिंदे, पतंगराव शिंदे यांनी मोलाचे सहकार्य केले