सरपंच असावा तर राजाराम शिंदे सरकार यांच्या सारखा गावच्या विकासासाठी अहोरात्र झटणारा…नेर्ली येथील धुलूगडे वस्ती (कडा) रस्त्याचे मुरुमीकरण केले स्वखर्चाने, केली वचनपूर्ती.

Google search engine
Google search engine

सरपंच असावा तर राजाराम शिंदे सरकार यांच्या सारखा..नेर्ली येथील धुलूगडे वस्ती (कडा) रस्त्याचे मुरुमीकरण केले स्वखर्चाने, केली वचनपूर्ती…….

 

 

 

नेर्ली येथील धुलूगडे वस्ती ( कडा ) रस्त्याचे काम बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित होते,अनेक निवडणुका झाल्या प्रत्येक वेळी फक्त आश्वासने मिळत होती, पण कोणीही लक्ष घालून काम केले नाही,रस्ता खराब होता, रस्त्यात मोठे खड्डे पडले होते, काळ्या मातीतून रस्ता होता, पावसाळ्यात धुलूगडे वस्तीला जाणे येणे बंद होत होते, मोटारसायकल सुद्धा जात नव्हती, धुलूगडे वस्तीला जायचे म्हणाले तर कडेगाव मार्गे – पोलीस स्टेशन समोरून नऊ किलोमीटरचा वळसा घालून धुलूगडे वस्तीला जावे लागत होते,ग्रामपंचायत निवडणुकीच्या वेळी धुलूगडे वस्तीच्या नागरिकांनी ही बाब मा श्री राजाराम शिंदे सरकार यांना सांगितली, निवडून आल्यावर ताबडतोब रस्त्याचे काम मार्गी लावण्याचा शब्द दिला होता,धुलूगडे वस्ती, मुजावर वस्ती अश्या नेर्लीतील बऱ्याच शेतकऱ्यांनी कडेगाव हद्दीतील जमिनी बऱ्याच वर्षांपूर्वी घेतल्या आहेत, शेतीच्या मशागतीसाठी शेतकऱ्यांना वारंवार शेतात जावे लागते, प्रत्येक वेळी कडेगाव मार्गे जाणे अडचणीचे होत होते ,निवडून आल्यावर नेर्ली गावचे लोकनियुक्त सरपंच मा श्री राजाराम शिंदे सरकार यांनी मिटिंग मध्ये रस्त्याचे काम करण्याचा विषय घेतला, पण धुलूगडे वस्ती, मुजावर वस्ती कडेगाव हद्दीत येते त्यामुळे नेर्ली ग्रामपंचायत कडून खर्च करता येत नाही असे समजले, क्षणाचाही विलंब न करता सरपंच राजाराम शिंदे सरकार यांनी मिटिंग मध्येच नेर्लीच्या बाजूने मुख्य अडचणीचा अंदाजे एक किलोमीटर रस्ता मी स्वखर्चाने मी करून देतो असे सांगितले, उर्वरित रस्त्याच्या कामासाठी कडेगाव चे नगराध्यक्ष मा श्री भय्या देशमुख यांचेशी बोलून कडेगाव च्या बाजूने काही रस्ता करून द्या असे सांगितले, मा भैय्या देशमुख यांनी पाहणी करून लगेच अंदाजपत्रक करायला सांगितले, सध्या शेतकऱ्यांनी मिळून कडेगावच्या बाजूने काही रस्त्यावर मुरूम टाकून रस्ता तयार केला,नेर्ली गावाच्या बाजूने अंदाजे एक किलोमीटर रस्ता नेर्ली गावचे लोकनियुक्त सरपंच मा श्री राजाराम शिंदे सरकार यांनी स्वतः उन्हात उभे राहून दोनच दिवसात पूर्ण करून घेतला, निवडणुकीपूर्वी दिलेला शब्द पूर्ण करून वचनपूर्ती केली,आता नेर्लीतून मुजावर वस्ती, आता धुलूगडे वस्तीला डायरेक्ट तीन किलोमीटर अंतरामध्ये जाता येते,लगेच रस्ता जनतेसाठी वापरण्यास खुला केला, याकामी उपसरपंच प्रकाश कांबळे, सदस्य संजय मोहिते, शंकर मुळीक, अभिजित वलेकर, सदस्या मुमताज मुजावर, मदिना आगा, संजीवनी पवार, गंगुबाई गायकवाड, सुरेखा लोंढे, सोसायटी चेअरमन चंद्रकांत पाटील, देवेंद्र शिंदे सरकार, सिकंदर मुजावर, सोसायटी संचालक जलाल मुजावर, राजू मुजावर यांनी सहकार्य केले,विशेष सहकार्य भाजपा सोशल मीडिया प्रमुख सिकंदर मुजावर,भाजपा जेष्ठ नेते ईलाही मुजावर, तसेच धुलूगडे वस्ती मधील सर्व ग्रामस्थ व तरुण मंडळाचे कार्यकर्ते यांचे होते