कडेगाव येथे भव्य दसरा महोत्सव व पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या रावण दहन कार्यक्रमाचे आयोजन

 

 

कडेगाव : स्व. आमदार संपतराव देशमुख यांच्या स्मारक स्थळावरील संकल्प सिद्ध प्रेरणास्थळ येथे विश्वसंग्राम फाउंडेशन यांचेवतीने उद्या रविवारी (ता.29) सायंकाळी सहा वाजता पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा भव्यदिव्य अशा दसरा व रावण दहन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.तेव्हा या आगळ्या वेगळ्या महोत्सवास पलूस-कडेगाव तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी येथे पत्रकारांशी बोलताना केले.
ते म्हणाले,या दसरा महोत्सवामध्ये 40 फुट रावणाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन होणार आहे.यासह विविध सांस्कृतिक व संगीत रजनी कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे.यामध्ये राजेश सरकटे निर्मित स्वरविहार संगीत कार्यक्रम,सिनेअभिनेत्री मानसी नाईक यांचा लावणी नृत्याविष्कार,रविंद्र खोमणे संगीता भावसार,प्राची माडीवाले,वैशाली माडे,अतुल कुलकर्णी यांचा गाण्याचा कार्यक्रम तर चला हवा येवू द्या फेम भारत गणेशपुरे यांचा कॉमेडी शो होणार आहे.तर जागतिक पातळीवर नावलौकिक मिळविलेल्या मुंबई येथील अनबिटेबल ग्रुपचा डान्स शो चेही आयोजन करण्यात आले आहे.
तसेच या कार्यक्रमास आजी-माजी मंत्री,आमदार यांचेसह विविध संस्थांचे पदाधिकारी व राजकिय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
तेव्हा या कार्यक्रमास पलूस-कडेगाव तालुक्यातील महिला, तरुण-तरुणी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संग्रामसिंह देशमुख यांनी यावेळी केले.
यावेळी युवा नेते व विश्वसंग्राम फौंडेशनचे अध्यक्ष विश्वतेज देशमुख यांचेसह फौंडेशनचे सर्व पदाधिकारी,सदस्य व कार्यकर्ते उपस्थित होते.
……………………….
………………………..