प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींप्रमाणेच कागदी लगद्याच्या गणेशमूर्तींवरही गोवा शासनाने बंदी घालावी !

0
644
Google search engine
Google search engine

हिंदु जनजागृती समितीची पणजी येथे पत्रकार परिषदेत मागणी

 

पणजी-– वर्ष २०११ मध्ये महाराष्ट्र शासनाने कागदी लगद्याच्या मूर्तींना प्रोत्साहन देणारा निर्णय घेतला. याविरोधात हिंदु जनजागृती समितीने राष्ट्रीय हरित लवादाकडे (National Green Tribunal) याचिका दाखल केली. राष्ट्रीय हरित लवादाने विविध संशोधन संस्था आणि पर्यावरणतज्ञ यांनी केलेल्या संशोधनाचा आधार घेत कागदी लगद्याच्या मूर्तीमुळे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत असल्याचे मान्य केले आणि ३० सप्टेंबर २०१६ या दिवशी महाराष्ट्र शासनाच्या कागदी लगद्याच्या मूर्तींना प्रोत्साहन देण्याच्या निर्णयावर स्थगिती आणली. गोवा शासन पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असते. काही वर्षांपूर्वी गोवा शासनाने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर बंदी आणून हे सिद्धही केले आहे. याच प्रकारे गोवा शासनाने प्रदूषणकारी कागदी लगद्याच्या मूर्तींवरही बंदी आणावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे राज्य समन्वयक डॉ. मनोज सोलंकी यांनी गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे केली आहे. डॉ. मनोज सोलंकी यांनी येथे घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. पत्रकार परिषदेला हिंदु जनजागृती समितीचे श्री. सत्यविजय नाईक आणि सनातन संस्थेच्या सौ. शुभा सावंत यांची उपस्थिती होती.