​गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली चे उपकेंद्र चंद्रपुर शहरमध्ये दयावे म.न.वि.से ची मागणी. 

0
643
Google search engine
Google search engine

चंद्रपुर-गोंडवाना विद्यापीठ निर्मितीपासुनच विद्यार्थीच्या डोकेदुखीचे ठरलेले आहे.विध्यार्थीची किवा कुठल्याही सामाजिक  संस्थेची मागणी नसतानासुध्दा नागपूर विध्यापिठाचा अतिरिक्त भार कमी करण्याकरीता गोंडवाणा विध्यापिठाची स्थापना गडचिरोली सारख्या नक्षलग्रस्त आणि सुविधेचा अभाव असलेल्या जिल्ह्यात चंद्रपूर जिल्ह्यातील विध्यार्थीना आपल्या शैक्षणीक कामाकरिता गडचिरोली जिल्हात जावे म्हणजे शारीरिक मानसीक आणि आर्थीक त्रासाला सामोरे जाणेच होय.                                  

                   चंद्रपुर शहरामध्ये अनेक नावाजलेले महाविद्यालये, शाळा, अभीयांत्रीकी महाविद्यालये मोठ्या प्रमाणात आहे.गडचीरोली जिल्ह्यातील विद्यार्थी सुदृधा चंद्रपुर शहरामध्ये शिक्षण घेण्याकरीता येतात.गडचिरोली जिल्ह्यापेक्षा चंद्रपुर शहरातील विध्यार्थ्याचीसंख्या जास्त आहे.आणि सोई सुवीधेच्या बाबतीत सुदृधा सोईस्कर आहे . हेच लक्षात घेता चंद्रपुर शहरातील किवा जिल्ह्यातील विध्यार्थीना त्यांच्या मायग्रेशन,इलिजीबीलीटी या सारख्या लहान सहान कामाकरीता  गडचिरोली जिल्ह्यात न जाता जर त्यांची कामे चंद्रपुर शहरातच झाली तर ते विध्यार्थीच्या आणि त्यांच्या पालकांच्या हिताचेच राहील म्हणून विध्यार्थीच्या हिताची रास्त मागणी चे निवेदन मनसे जिल्हाअध्यक्ष श्री दिलीपभाऊ रामेडवार,मनविसे जिल्हाअध्यक्ष राहुल बालमवार यांच्या मार्गदर्शनात मनविसे जिल्हाउपाध्यक्ष कुलदीप चंदनखेडे यांच्या नेतृत्वात मा.आशीतोष सलील जिल्हाअधिकारी साहेब,मा.पालकमंत्री,मा.केंद्रीय राज्यमंत्री,मा.शिक्षणमंत्री म.रा.का.मा.कुलगुरू गोंडवाना विध्यापिठ यांना देण्यात आले सदर निवेदन देताना विवेक धोटे तालुका अध्यक्ष , प्रफूल कूचनकर,नितीन टेकाम,किशोर मडगुलवार,सुनील खामनकर,नरेश धंदरे,सूचित नांदे, नितेश जुमडे शहर ऊपाध्यक्ष , प्रकाश नागरकर,राकेश बोरिकर,धनंजयपिंपडशेंडे,प्रविण शेवाडे,सतीश वाकडे,अक्षय वैरागडे यांची उपस्थीती होती