बारावीचा निकाल जाहीर, यंदाही मुलींचीच बाजी. बारावीचा निकाल जाहीर, यंदाही मुलींचीच बाजी.

0
716
Google search engine
Google search engine

महेंद्र महाजन जैन रिसोड  (वाशिम) 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी/मार्च 2017 मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला यंदा राज्याच्या नियमित विद्यार्थ्यांच्या निकालाची टक्केवारी 89.50 इतकी असून मागील वर्षाच्या तुलनेत यंदा निकालात 2.90 टक्क्यांनी वाढ झाली. मुलींनी निकालात सरशी कायम राखली आहे. कोकण विभाग अव्वल स्थानी असून मुंबई विभाग शेवटच्या क्रमांकावर आहे. पुणे विभागाचा निकाल 91.16 टक्के लागला आहे. राज्य मंडळातर्फे फेब्रुवारी/ मार्च 2017 मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या निकालाची घोषणा राज्य मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली. बारावीचा आॅनलाईन निकाल मंगळवारी (दि.30) जाहीर करण्यात आला असला तरी विद्यार्थ्यांना  येत्या 9 जून रोजी दुपारी 3 वाजता संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात मुळ गुणपत्रिकांचे वितरण केले जाणार आहे. गेल्या वर्षी राज्याचा बारावीचा निकाल ८६.६० टक्के लागला होता. यावर्षी 89.50 टक्के निकाल लागल्याने राज्याच्या निकालात 2.90 टक्के वाढ झाली. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 95.21 टक्के तर मुंबई विभागाचा निकाल सर्वात कमी 88.21 टक्के लागला आहे.  गेल्या काही वर्षांपासून बारावीच्या निकालात मुलांपेक्षा मुली आघाडीवर आहेत. यंदा मुलींची निकाल 93.05 टक्के तर मुलांची निकाल 86.65 टक्के लागला आहे. अपंग विद्यार्थ्यांचा निकाल 93.01 टक्के लागलाआह ेविद्यार्थ्यांना राज्य मंडळाच्या अधिकृत संकेत स्थळावर तसेच मोबाइलद्वारे एसएमएस करून निकाल प्राप्त करून घेता येईल, असे राज्य मंडळातर्फे कळविण्यात आले आहे.

विभागीय मंडळ निहाय बारावीचा निकाल –

पुणे  –  91.16 टक्के

नागपूर   –  89.05 टक्के

औरंगाबाद – 89.83 टक्के

मुंबई   – 88.21 टक्के

कोल्हापूर   – 91.40 टक्के

अमरावती  – 89.12 टक्के

नाशिक   –  88.22 टक्के

लातूर   –   88.22 टक्के

कोकण   –  95.20 टक्के
_________

मोबाइलवर निकाल बीएसएनएल-धारकांनी –

 MHHSC<space><seat no>  असे टाइप करून 57766 या क्रमांकावर एसएमएस केल्यास निकाल प्राप्त होईल.

तसेच आयडिया, व्होडाफोन, रिलायन्स, टाटा मोबाइल धारकांनी –

 MAH12 <space><Roll Number> असे टाइप करून 58888111 या क्रमांकावर एसएमएस केल्यास निकाल मिळू शकेल.

__________