*प्रतिष्ठेच्या ठरलेल्या अचलपूर नगरपालिका प्रभाग क्रमांक 19 ब मध्ये शिवसेनेच्या सारीका पिंपळे विजयी*

0
712
Google search engine
Google search engine

अचलपूर / श्री प्रमोद नैकेले /–


अचलपूर / श्री प्रमोद नैकेले /-
स्थानीक प्रभाग क्रमांक 19 ब शहिद भगतसिंह वार्ड येथे नुकत्याच पार पडलेल्या पोटनिवडणुकीत चुरशीच्या लढतीत निकालाअंती सारीका पिंपळे                  यांचा विजय झाला.
    अचलपूर नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 19 ब सर्वसाधारण महिला गटाची पोटनिवडणुक 24 मे रोजी प्रत्यक्ष मतदान होवून पार पाडली ही जागा येथून सार्वत्रिक निवडणुकीत विजयी झालेल्या शिवसेनेच्या सुनिता नरेंद्र फिसके ज्या नगराध्यक्ष म्हणून सरळ लढतीत विजयी झाल्या त्यांच्या या नगरसेवक पताचा राजीनाम्याने रिक्त झाली.पोटनिवडणुकीत शिवसेनेने सारीका अनिल पिंपळे,भाजपाच्या सारीका धर्मा राउत,अपक्ष लता रामभरोसे गौर,संगीता लोखंडे व साजीदा बानू या पाच उमेदवारामध्ये लढत झाली व 6132 पैकी 4259 मतदारांनी मतदान चा हक्क बजावला.मतदानाची टक्केवारी होती 69.34%.यामध्ये सारीका पिंपळे व लता गौर यांच्यात आमनासामना होवून मतगणनेत  संगीता लोखंडे(47)साजेदा बानू(17)सारीका राउत(336) एवढ्या मतावर समाधान मानावे लागले तर सारीका अनिल पिंपळे यांना (2347) व लता रामभरोसे गौर यांना (1477) अशी मते प्राप्त झाली नोटा ला 22 मते पडली. अशा प्रकारे शिवसेनेच्या सारीका पिंपळे यांनी लता गौर                 यांचा अवघ्या 870 एवढ्या मतांनी पराभव करून ही जागा जिंकली यामुळे आता सभागृहात शिवसेनेचे नगराध्यक्ष सह दोन नगरसेवक असे 3             संख्याबळ झाले आहे.