चित्रपटसृष्टीतील लोक पैशांसाठी नग्नही होतील ! – खासदार साक्षी महाराज

0
1272
Google search engine
Google search engine

 

 

नवी देहली – भारतातील चित्रपटसृष्टीला अस्मिता किंवा राष्ट्रवाद याच्याशी काही देणेघेणे नाही. त्यांना फक्त पैसा हवा आहे. यासाठी ते नग्न होऊन नाचण्यासही सिद्ध होतील, अशी कठोर टीका भाजपचे खासदार साक्षी महाराज यांनी केली आहे. ‘पद्मावती’ चित्रपटाविषयी बोलतांना साक्षी महाराज म्हणाले, ‘‘इतिहासाची मोडतोड सहन केली जाणार नाही. पद्मावती, महाराणी, हिंदू आणि शेतकरी यांची मस्करी केली जात आहे. हे चुकीचे आहे, हे सरकार आणि प्रशासन यांना समजले पाहिजे अन् ‘पद्मावती’ चित्रपटावर बंदी घातली पाहिजे.’’