बोन्ड अळी ने शेतकऱ्यांचे झालेल्या  नुकसानाची  भरपाई देण्याची  काँग्रेस कमिटी व युवक काँग्रेसची निवेदन द्वारे तहसीलदार यांना मागणी

0
510
Google search engine
Google search engine

प्रतिनिधी/गजानन खोपे
वाठोडा शुक्लेश्वर :-

भातकुली तालुक्यातील शेतकरी , तालुका काँग्रेस कमिटी व युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी विभागीय तहसील कार्यालय गाठून तहसीलदार श्री येडे साहेब यांची भेट घेऊन गुलाबी बोंड अळी व बोगस बी टी बियाणे मुळे प्रादुर्भाव झालेल्या पिकांच्या नुकसानी मुळे त्रस्त शेतकऱ्यांनी या बियाणे कंपनीवर गुन्हे दाखल करा ही मागणी लावून धरली. यावेळी मा.जयंतराव देशमुख सुद्धा उपस्थित झाले व याबाबत ईतर जिल्ह्याप्रमाणे अमरावती जिल्हयातील शेतकरी सुद्धा संकटात आहे व ईतर जिल्ह्यात या बियाणे कंपनीवर गुन्हे दाखल झाले आहेत पण अमरावती येथे कृषि विभाग गंभीर नाही ही बाब सांगतली .
यावेळी मा.जयंतराव देशमुख (बांधकाम व आरोग्य सभापती)यांच्या नेतृत्वात बोन्ड अळी साठीच्या नुकसान भरपाई व संबंधित कंपनी वर कारवाई होण्यासाठी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले
यांच्यासह तालुका अध्यक्ष मुकद्दर खा पठाण, युवक काँग्रेसचे शेखर अवघड,उमेश वाकोडे, उमेश महिंगे,नरेंद्र मकेश्वेर, युवक काँग्रेसचे अंकुश जुनघरे, वैभव स वानखडे, शेतकरी प्रमोद इटके, संजय माकोळे,सुनील अग्रवाल,कळसकर गुरुजी, साहेब,देवानंद महिंगे,विजय मुंडाले,सतीश माकोळे,गणेश इटके, देवेंद्र बनारसे,राहुल ठाकरे,अमेय इंदोरे,सागर आमझरे आदी मंडळी उपस्थित होते.