*आ. यशोमतीताई ठाकुर यांच्या नेतृत्वात बोन्ड अळी साठीच्या नुकसान भरपाई व संबंधित कंपनी वर कारवाई होण्यासाठी एल्गार*

0
1187
Google search engine
Google search engine

प्रतिनिधी/गजानन खोपे
वाठोडा शुक्लेश्वर :-

भातकुली तालुक्यातील शेतकरी , तालुका काँग्रेस कमिटी व युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्त कार्यालय गाठून आज विभागीय आयुक्त श्री पियुष सिंह यांची भेट घेऊन गुलाबी बोंड अळी व बोगस बी टी बियाणे मुळे प्रादुर्भाव झालेल्या पिकांच्या नुकसानी मुळे त्रस्त शेतकऱ्यांनी या बियाणे कंपनीवर गुन्हे दाखल करा ही मागणी लावून धरली. यावेळी आमदार यशोमतीताई ठाकूर सुद्धा उपस्थित झाल्या व याबाबत ईतर जिल्ह्याप्रमाणे अमरावती जिल्हयातील शेतकरी सुद्धा संकटात आहे व ईतर जिल्ह्यात या बियाणे कंपनीवर गुन्हे दाखल झाले आहेत पण अमरावती येथे कृषि विभाग गंभीर नाही ही बाब सांगत यशोमतीताई ठाकूर यांची मागणी मान्य करत भातकुली तालुक्यासह जिल्ह्यातील या बियाणे कंपनी वर गुन्हे दाखल करण्याचे आदेश कृषि विभागाचे श्री नागरे साहेब यांना देण्यात आले.
गुन्हे दाखल होई पर्यंत सदर शेतकरी कार्यालय सोडणार नसल्याचेही बोलले.
यावेळी आमदार यशोमती ठाकूर यांच्यासह तालुकाअध्यक्ष मुकद्दर खा पठाण, युवक काँग्रेस चे उमेश महिंगे, युवक काँग्रेसचे अंकुश जुनघरे, वैभव स वानखडे, शेतकरी प्रमोद इटके, संजय माकोळे,सुनील अग्रवाल,कळसकर गुरुजी, साहेब,देवानंद महिंगे,विजय मुंडाले,सतीश माकोळे,गणेश इटके, देवेंद्र बनारसे,राहुल ठाकरे,अमेय इंदोरे,सागर आमझरे आदी मंडळी उपस्थित होते.