पहा कुठे झाला शेतकऱ्याची फसवणुक करणाऱ्या कंपनीवर गुन्हा दाखल….

0
784
Google search engine
Google search engine

शेतकऱ्याची फसवणुक करणाऱ्या कंपनीवर आसेगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल

कावेरी सिड्स आणि अजित सिड्स कंपनी वर 420 भादवी गुन्हा दाखल

 

 

बादलकुमार डकरे / चांदुर बाजार – 

 

 

 

अमरावती जिल्ह्यातील चांदुर बाजार तालुक्यात येणाऱ्या आसेगाव पोलीस स्टेशन येथे दिनांक 27 नोव्हेंबर ला शेतकरी याची फसवणूक झाल्याची लेखी तक्रार राजेंद्र म्हसे कृषी अधिकारी यांनी दिली.त्यांच्या लेखी तक्रारीवरून आसेगाव पोलिसांनी भादवी 420 आणि महाराष्ट्र कॉटन सिड्स 13 अंतर्गत गुन्ह्याची नोंद झाली असून याचा पुढील तपास आसेगाव येथील पोलीस करीत आहे.

संजय माकोडे, प्रमोद इतके,उमेश महिगे,रामदास डाकूलकर,देवानंद महिगे,निर्मला बाई महिगे,दीपक जसापुरे,यांनी सर्व पूर्णांनगर येथील शेतकरी यांनी कृषी अधिकारी म्हस्के यांच्याकडे दिनांक 3 ऑक्टोबर ला बीटी कपाशिवरील बोड अळी,मोठ्या प्रमाणात असल्याची तक्रार दिली होती.सदर तक्रारीची दखल घेऊन कृषी अधिकारी शेतकरी याच्या शेतात जाऊन पाहणी केली असता त्यांना बीटी कपासीवर 96%बोड अळीचा पादुर्भाव असल्याचे लक्षात आले.वरील शेतकरी यांनी कावेरी सिड्स आणि अजित सिड्स याच्या वर बोड अळीचा इतका प्रादुर्भाव यायला नको पाहिजे होता.मात्र पाहणी दरम्यान सत्य लक्ष्यत आले.तसेच कंपनी ने सांगितल्या प्रमाणे यावर बोड अळी यायला च नाही पाहिजे होती.दोन्ही कंपनी ने सांगितल्या प्रमाणे बियांने न देऊन शेतकरी यांची फसवणुक केली त्यामुळे त्याच्या वर कार्यवाही करण्यासाठी तक्रार प्राप्त होताच अजित सिड्स आणि कावेरी सिड्स वर कलम 13 महाराष्ट्र कॉटन ऍक्ट 2009 आणि भादवी 420 अंतर्गत गुन्ह्याची नोंद झाली आहे.आर्थिक लाभासाठी शेतकरी यांची फसवणूक करणाऱ्या कंपनी वर कार्यवाही व्हावी अशी पूर्णा नगर येथील शेतकरी वर्ग याची मागणी असल्याचे चित्र स्पष्ट  होत आहे.