*हनवतखेड येथील आदिवासी आश्रम शाळा संचालकांच्या मनमाणीविरोधात पाच कर्मचाऱयांनी विषारी औषध प्राशन केल्याने खळबळ*

0
1036
Google search engine
Google search engine

जळगाव जामोद/ राहुल निर्मळ :-

गेल्या 12 वर्षांपासून अनुदानित प्राथमिक आदिवासी आश्रम शाळा हनवतखेड येथे काम करतांना पदा व्यतिरिक्त व मदसनिस वरील अतिरीक्त कामे करून घेतल्या जातात त्यामुळे लेखी व तोंडी तक्रार करूनही संबंधितांणी दखल न घेतल्याने आश्रम शाळेतील पाच स्वयंपाक गृहातील कर्मचाऱ्यांनी सामूहिक रित्या ‘थिमेट’ नावाचे विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना सकाळी घडली या घटनेतील कर्मचारी सुनील अर्जुन उतपुरे 38, विजय गणपत राणे 35, संजय जगन्नाथ बोंबाटकर30, भारत छगन कांबळे33, व रवींद्र विठ्ठल माळोकार यांची प्रकृति गंभीर आहे. पाचही जणांना प्रथम जळगाव येथे नंतर नांदुरा व त्यांनतर खामगाव येथिल सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आके आहे घटना घडली ती आश्रम शाळा 100 टक्के अनुदानित असून महात्मा फुले मागासवर्गीय सेवा संस्थांच्या वतीने ही आश्रम शाळा चालविण्यात येत आहे . संस्थेचे अध्यक्ष म्हणून दिनेश सातव तर सचिव म्हणून सत्यविजय सातव हे काम पाहतात

पिळवणुकी विरोधात तक्रार करूनही कारवाही नाही

अनुदानित आदिवासी आश्रम शाळातील वरील पाच कर्मचारी 1 आक्टोबर 2005 पासून पदा व्यतिरिक्त काम करीत आहेत याबाबत 5 डिसेंबर2017 व 16 सप्टेंबर2017 राजी लेखी तक्रार देहूनही संबंधितांनविरुद्ध कारवाही झाली नाही त्यामुळे सदर कर्मचाऱ्यांनी सामूहिकरीत्या विष प्राशन केल्याचा टोकाचा निर्णय घेतला या घटनेमुळे शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे विशेष म्हणजे अधिक्षक यांना दिलेल्या निवेदनावर आश्रम शाळेतील 8 कर्मचाऱ्यांच्या सह्या आहेत