हातभट्टी आणि सट्टा पट्टी करणारे शिरजगाव पोलिसाच्या जाळ्यात

0
546
Google search engine
Google search engine

बादल डकरे / चांदुर बाजार :-

26 डिसेंबर ला सकाळी 11 च्या दरम्यान शिरजगाव कसबा पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहिती वरून करजगाव येथे हातभट्टी ची दारूची विक्री सुरु आहे .पोलिसांनी अचानक अब्दुल रशीद शे,हबीब वय 43 वर्ष रा करजगाव याच्या राहत्या घरी रेड केली.त्यामध्ये पोलिसांना गावठी दारू अंदाजित किंमत 2000 रुपये,एक फ्रिज किंमत 10000 रुपये,एक मोबाइल फोन किंमत 1000 रुपये अशा एकूण 13000 चा मुद्दे माल शिरजगाव पोलिसांनी ताब्यात घेतला.

खरपी या ठिकाणी पोलिसांनी रेड केली असता त्यांच्या हाती गुड्डू उर्फ आरिफ खा हबीब खा वय 37 या सत्तपट्टी करताना आढळून आला.पोलिसांनी त्यांना जागेवरून ताब्यात घेतले आहे त्याच्या कडूम mh 27,BA 5698 किंमत 50000 मोटार सायकल,मोबाइल किंमत 2000 रुपये,सट्टा पट्टीचे साहित्य अशा एकूण 52455 रुपये नगदी मुद्देमाल जप्त केला.

वरील दोन्ही कार्यवाही ठाणेदार श्री मुकुंद कवाडे आणि शिरजगाव कसबा पोलिसांनी केल्या.