विद्यार्थिनीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करणार्‍या दोघालाही कारावासाची शिक्षा

0
572
Google search engine
Google search engine

अमरावती /गजानन खोपे-

परीक्षेकरिता गेलेल्या एका विद्यार्थिनीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना दोन वर्षांपूर्वी भातकुली येथे घडली होती. त्या प्रकरणातील आरोपी संदीप रामदास रावेकर याला 10 वर्षांचा कारावास तर त्याचा मित्र मंगेश कुकडे याला ३ वर्षाच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. सदर निकाल हा अमरावती जिल्हा व सत्र नायायालयाने लावला.

२४ मार्च २0१५ रोजी एका १0 वर्षीय विद्यार्थिनींची परीक्षा असल्याने ती भातकुली येथे गेली होती. त्यानंतरच्या दरम्यान संदीपने तिचे अपहरण केले होते. त्यामध्ये त्याचा मित्र मंगेशने त्याला मदत केली होती. त्यावेळी या घटनेची माहिती कुणालाही नसल्याने तिच्या वडिलांच्या तक्रारीवरून तिच्या अपहरणाची तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतरच्या पोलीस तपासादरम्यान ती युवती पोलिसांना मिळून आली सोबतच पोलिसांनी त्या दोघालाही अटक केली.त्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. बुधवारी याप्रकरणी याचिका जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल करण्यात आली. न्यायालयाने सर्व साक्षीदार तपासून संदीपला दहा वर्षांचा कारावास तर त्याचा मित्र मंगेशला तीन वर्षांचा कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली.