श्री शिवप्रतिष्ठान, हिदुस्थानची प्रतापगड ते रायरेश्‍वर धारातीर्थ यात्रा मोहीम

0
1293
Google search engine
Google search engine

सातारा – श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानच्या वतीने आयोजित केलेल्या धारातीर्थ यात्रा तथा गडकोट मोहिमेचा समारोप ३० जानेवारीला रायरेश्‍वराच्या कुशीत वसलेल्या जांभळी (तालुका वाई) येथे होत आहे. पू. संभाजीराव भिडेगुरुजींचे या प्रसंगी होणारे मार्गदर्शन शिवप्रेमींसाठी उद्बोधक असणार आहे. या प्रसंगी शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे आणि खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांसह अनेक मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे.

या वर्षी २६ ते ३० जानेवारी या कालावधीत प्रतापगड ते रायरेश्‍वर (जावळी अरण्यमार्गे) धारातीर्थ यात्रा मोहीम होत आहे. शुक्रवार, २६ जानेवारीला दुपारी प्रतापगडावरील आई श्री भवानीदेवीची आरती करून मोहिमेस प्रारंभ झाला. अग्रभागी टेहळणी पथक, भगवा ध्वज घेतलेले मानकरी, शस्त्रपथक आणि त्यामागे शिवरायांचा जयघोष करत मार्गक्रमण करणारे सहस्रो धारकरी असे मोहिमेचे स्वरूप आहे.

मोहिमेच्या ५ दिवसांच्या कालावधीत मुक्कामाच्या ठिकाणी इतिहासतज्ञ आणि मान्यवर वक्ते यांनी धारकर्‍यांना राष्ट्र-धर्म, तसेच इतिहास यांविषयी मार्गदर्शन केले. मोहिमेत देशभरातून आलेले ५० सहस्रांहून अधिक धारकरी सहभागी झाले आहेत. जांभळी येथील कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.