श्रींच्या प्रगट दिन महोत्सवा निमित्त नप,शेगांव चा अभिनव उपक्रम

0
199
Google search engine
Google search engine

न.प.शेगांव व्दारे शहरात स्वच्छतेचे भारुड व विविध माध्यमातुन केली जनजागृती

शेगांव :- नगर परिषद,शेगांव यांचा वतिने श्री संत गजानन महाराज यांचा प्रगट दिन महोत्सवा निमित्य शहरात लाखो भाविक भक्त मोठ्या प्रमाणावर शेगांव शहरात येतात त्यांना शहरामध्ये स्वच्छते संदर्भात चालू असलेल्या विविध अभियानाची व उपक्रमाबाबत माहिती होण्याकरिता शेगांव नगर परिषद कडुन श्री संत गजानन महाराज यांच्या मंदिरा कडे जाणारा गांधी चौक येथे न.प.शेगांव चे प्रशासक तथा मुख्याधिकारी डाॅ.जयश्री काटकर (बोराडे) यांच्या मार्गदर्शनाखाली व उपअभियंता यांत्रिकी व पर्यावरण तसेच आरोग्य विभाग प्रमुख संजय मोकासरे यांच्या नेतृत्वाखाली साने गुरुजी कला व सांस्कृतिक क्रीडा बहु.मंडळ,पातुर व नगर परिषद, शेगांव यांच्या वतीने स्वच्छते संदर्भात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी कार्यक्रमाची सुरुवात न.प चे प्रशासक तथा मुख्याधिकारी डॉ.जयश्री काटकर (बोराडे) मॅडम व कार्यालय अधीक्षक वैभव वरणकार सर आणि संजय मोकासरे सर यांच्या हस्ते श्रींच्या प्रतिमेचे पूजन, हार अर्पण व दीप प्रज्वलन करून करण्यात आली त्यानंतर मंडळाच्या वतीने स्वच्छतेचे भारुड सादर करून व विविध लोकगितातुन आणि लोककलेतून जनजागृती करण्यात आली त्यामध्ये स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत शहरामध्ये स्वच्छ सर्वेक्षण २०२४ व माझी वसुंधरा अभियान ४.० बाबत माहिती, शिक्षण व संवाद (IEC) उपक्रमांतर्गत नागरिकांनी घरातील व दुकाना मध्ये निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे वर्गीकरण करून ओला व सुका व घातक कचरा वेगवेगळा करावा आणि तो कचरा नियमित न.प.च्या घंटा गाडीत देऊन आपलं घर व दुकान आणि शहर हे कचरा मुक्त करण्यासाठी सहकार्य करावे त्याच बरोबर माझी वसुंधरा अभियानातील पाच तत्वे पृथ्वी, जल, वायु, अग्नी व आकाश या पंचतत्वाचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी नागरिकांनी सहभागी व्हावे यासाठी स्वच्छते संदर्भात चालु असलेल्या विविध उपक्रमाची माहिती व महत्वाचा संदेश शाहीर विशाल राखोंडे यांनी दिला तर स्वच्छता म्हणजे रोजचा सन नाहितर कायमचे आजार पन यावर सौ विद्याताई भगत यांनी गोंडीनची वेशभूषा घेऊन जनजागृती करत शाहीर निरंजन भगत व त्यांच्या संचानी साथसंगत करून लोकजागृती केले. यावेळी न.प आरोग्य विभागाचे सि.टि.कॉर्डिनेटर गीतांजली शास्त्री व स्वच्छता सखी तसेच आरोग्य विभागातील कर्मचारी व सर्व न.प. विभाग प्रमुख व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. तसेच नप तर्फे संपूर्ण शेगांवाची सफाई करुन, पावडर मारणे स्वच्छताबाबत इत्यादी सर्व चोख व्यवस्था करण्यात आली होती. नगर परिषद कडुन यांनी विविध ठिकाणी फिरते कचरा संकलन केंद्र उभारण्यात आले होते तसेच शेगांव न.प.कडुन श्रींच्या प्रगट दिना निमित्य आलेल्या भक्तांचे स्वागत नगर परिषदे कडून करण्यात आले यावेळी शहरातील नागरिक व भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहुन कार्यक्रमाचा लाभ घेतला.