गोरगरीब जनतेच्या हिशाचा 300 क्विंटल रेशनचा तांदूळ पोलिसांच्या ताब्यात

0
232
Google search engine
Google search engine

संग्रामपूर तालुक्यातील सराईत पप्पूला पोलीस ओळखत नाही.
उशिरापर्यंत ही गुन्हे दाखल न झाल्याने शेगाव ग्रामीण पोलिसांवर संशयाची सुई

शेगाव- बुलढाणा जिल्ह्यात प्रचंड प्रमाणात सुरू असलेल्या धान्य काळा बाजाराचा पर्दाफाश, अप्पर पोलीस अधीक्षकांच्या पथकाने रविवारीच पकडले होता वाहन ट्रक क्रमांक एम एच 30 बिडी 24 79 या वाहनात गोरगरिबांच्या हिश्याचा रेशनचा तांदूळ असल्याच्या संशयाने पोलीस अधीक्षक यांच्या पथकाने या वाहनाचा पाठलाग करत वाहनाला अडूनझडती घेतली असता रेशनचा 300 क्विंटल तांदूळ असल्या ची स्पष्टता झाली अप्पर पोलीस अधीक्षकांच्या पथकाने हे वाहन भोणगाव फाट्यावर धरून त्याला शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये आणून शेगाव ग्रामीणचे ठाणेदार दिलीप वडगावकर यांच्या हवाली करत पुढील कारवाईस सुरुवात केली पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांच्या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीवरून त्यांच्या पथकाने सापळा रचून ही मोठी कारवाई केली या अगोदरही शेगाव पोलीस स्टेशन ने दीड वर्षा अगोदर अशीच कारवाई करत दोनशे पोते तांदूळ जप्त केले होते तो तांदूळ आठ ते दहा महिने पोलीस स्टेशनला जमा होता परंतु आमच्या चैनल च्या बातम्यांमुळे पुरवठा विभाग आणि तहसीलदार शेगाव यांना त्या माफियांवर कारवाई करत त्वरित तांदळाची उचल पोलीस स्टेशन मधून करावी लागली होती.

गोरगरिबांच्या हिश्याचा तांदूळ असा कसा या राशन माफियांच्या हाती लागतो? तर विशेष म्हणजे या प्रकरणातील धान्याचा मालक असलेल्या संग्रामपूर तालुक्यातील पप्पू ने दुपारी शेगाव ग्रामीण ठाण्यात भेट दिल्याची गुप्त माहिती आहे तरीही या राशन माफीयाला पोलीस प्रशासन ओळखत नाही? यांच्या या अशा वागण्यावरून शेगाव ग्रामीण पोलीस प्रशासनावर संशयाची सुई जाते हे महत्त्वाचे.
रविवारी पकडलेल्या तांदळाच्या ट्रकवर आज शुक्रवार आला तरीही कार्यवाही नाही तर काल दिवसभर सोशल मीडियावर वेगवेगळ्या चर्चांना उधान होते हा रेशनचा तांदूळ कोणाचा तर काहींच्या मते यात राजनीतिक लोकांचे सुद्धा हात काळे आहेत अशी चर्चा सुरू होती.