काँग्रेसचे झुंजार नेते प्रा.टी.पी.मुंडे सर

0
818
Google search engine
Google search engine

काँग्रेसचे झुंजार नेते प्रा.टी.पी.मुंडे सर

बीड: नितीन एस  ढाकणे

अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटीच्या कार्यकारणी वर सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा संस्थेचे अध्यक्ष प्रा. टी. पी.मुंडे यांची निवड झाल्याबद्दल जवाहरलाल नेहरू महाविद्यालयात प्राध्यापक, कर्मचारी, नियामक मंडळ सदस्य यांच्या संयुक्त विद्यमाने प्रा. के.आर.बंग यांच्या हस्ते प्रा. टी. पी.मुंडे यांचा शाल, हार, श्रीफळ, पुस्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला.

सत्कार समयी प्रा.के.आर.बंग असे म्हणाले की, काँग्रेस पक्ष देशातील सर्वात मोठा पक्ष असून सर्वात जुना पक्ष आहे.या पक्षाला इतिहास आहे. या पक्षातील नेत्यांनी प्राण गमवावे लागले. काँग्रेस पक्ष हा सर्व सामान्यांचा पक्ष असून काँग्रेस पक्षात मागील पंचवीस -तीस वर्षांपासून काँग्रेस पक्षाचे काम करणारे प्रा. टी. पी.मुंडे यांनी समाजातील गोरगरीब ,दलित, अल्पसंख्याक, महिला, युवक यासाठी काम करत आहेत याच कार्याची पावती म्हणून काँग्रेस पक्षाने अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटीच्या कार्यकारणीवर सदस्य म्हणून निवड केली .ही निवड म्हणजे संघर्षशील नेतृत्वाला मिळऊन दिलेला न्यायचं मनावा लागेल .

खऱ्या अर्थाने मराठवाड्या मध्ये प्रा टी पी मुंडे यांनी पक्ष वाढी साठी मोठ्या प्रमाणामध्ये योगदान दिले आहे.प्रा टी पी मुंडे यांना विरोधकांनी राजकीय कोंडी करण्याचा बराच प्रयत्न केला परंतु हे झुंजार नेते आपल्या ध्येया पासून मागे गेले नाही.

ओ.बी.सी. च्या माध्यमातून संबंध महाराष्ट्र मध्ये नेतृत्व सध्या ते करत आहेत आणि झुंजार प्रा टी पी मुंडे यांना ओ बी सी नेते असा जनता उलेख करू लागली आहे

यावेळी उपस्थित नियामक मंडळ सदस्य, प्रा. के.आर.बंग, प्रा.जि. एम.अवस्थी , प्रा.नरहरी काकडे, श्री.गाडे गुरुजी, श्री.सुधीर फुलारी,शेख अहमद अंकल, प्रा डॉ. महादेव रोडे,प्राचार्य डॉ. बी.डी. मुंडे,काँग्रेस तालुकाअध्यक्ष सुर्यकांत मुंडे,शफीउल्ला खान, महिमुद भाई, पठाण भाई, नूर बानो खाला, महाविलायचे सर्व प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी व विध्यार्थीनी मोठया प्रमाणात सत्कार प्रसंगी उपस्थित होते.