सरकारची उदासीनता हेच बेरोजगारीचे खरे कारण – श्री सुभाष वारे >< चांदुर रेल्वेत विदर्भातील पहिली सुशिक्षीत बेरोजगार परीषद संपन्न

0
1031
Google search engine
Google search engine
चांदूर रेल्वे – (शहेजाद खान ) 
     देशाची वाढती लोकसंख्या, उच्चशिक्षित समाज व आरक्षण हे कोणत्याही देशातील बेरोजगारीचे कारण असूच शकत नाही. कारण जेवढी लोकसंख्या वाढते तेवढ्या गरजासुद्धा वाढतातच. भारतीय संविधानातील राज्य धोरणाची निर्देशक तत्वे कलम ४१ नुसार बेरोजगारांच्या रिकाम्या हाताला काम देण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे हे विसरून चालणार नाही. त्यामुळे सरकारचे युवकांप्रति बेजबाबदारी व आखलेली धोरणे किंवा सरकारची उदासीनता हेच मुख्य बेरोजगार वाढीचे कारण असल्याचे प्रतिपादन सुराज्य सेनेचे संस्थापक व संविधान अभ्यासक सुभाष वारे यांनी व्यक्त केले. ते मंगळवारी चांदुर रेल्वे शहरात स्वराज्य सेना, माणुसकी बहुउद्देशीय संस्था, साहस जनहितकारी बहुउद्देशीय संस्था, प्रहार विद्यार्थी संघटना, ए.आय.एस.एफ., आझाद हिंद क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बेरोजगारांच्या प्रश्‍नाला वाचा फोडणारी विदर्भातील पहिल्या सुशिक्षित बेरोजगार परिषदेमध्ये बोलत होते.
      शहरातील अशोक टॉकीजमध्ये आयोजीत कार्यक्रमाला वक्ते म्हणुन सुभाष वारे व राजेंद्र भिसे तर प्रमुख पाहुने म्हणुन स्व. मदनगोपाल मुंदडा महाविद्यालयाचे प्राचार्य जयंत कारमोरे, राजर्षी शाहु महाविद्यालयाचे प्राचार्य एस.एस. ठाकरे, नितीन गवळी, गौरव सव्वालाखे यांची मंचावर प्रामुख्याने उपस्थिती होती. सदर कार्यक्रम सुरू होण्यापुर्वी सिनेमा चौकातील चंद्रशेखर आझाद यांच्या पुतळ्याला हारार्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरूवात शहीद भगतसिंग यांच्या प्रतिमेला हारार्पण करून करण्यात आली. कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात उपस्थित बेरोजगार युवकांचे मत जाणुन घेतल्या गेले. व्यथा, समस्या व दशा समाजापुढे विचार व्यासपिठावरून प्राविण्य देशमुख, कु. मयुरी चौधरी, ममता बोरकर, आदेश राजनेकर, नागेश काळमेघ, अमित अलोने, प्रभाकर अर्जापुरे, अजाबराव घटारे अशा अनेक सुशीक्षीत बेरोजगारांनी सरकारी धोरणे चुकीचे असल्याचे ताशेरे ओढले. दुसऱ्या सत्रात नितीन गवळींनी आपल्या प्रास्ताविकामध्ये म्हटले की, युवकांनी पदव्या संपादित केल्या. परंतु त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन उपलब्धेत उणिव राहिले. सदर युवक ना मजुरी करू शकतात ना त्यांना नौकरी मिळत आहे. स्वातंत्र्याचे ६८ वर्ष उलटुनही युवकांचे व शेतकऱ्यांचे प्रश्न जै थे राहिले आहे. तिसऱ्या सत्रात प्रमुख वक्ते सुभाष वारे व राजेंद्र भिसे यांनी युवकांना मार्गदर्शन केले. मुंबई येथील सुराज्य सेनेचे सदस्य राजेंद्र भिसे यांनी म्हटले की, हे सरकार गरीब नसुन गल्लेलठ्ठ आहे. देशाची ४० कोटी लोकसंख्या असतांना देशाचे पहिले बजेट ३४७ कोटीचेच होते. परंतु ते बजेट आता २४ लाख कोटीपर्यंत पोहचलेले आहे. याचा अर्थ आर्थिक सक्षमता वाढीस लागली असुन युवक व शेतकऱ्यांचे प्रश्न मात्र अति गंभीर दिसत आहे. सदर कार्यक्रमाचे मुख्य आयोजक नितीन गवळी व गौरव सव्वालाखे होते.
         कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता शहेजाद खान, प्राविण्य देशमुख, चेतन भोले, सौरभ इंगळे, संदिप शेंडे, सागर दुर्योधन, निलीमा जवंजाळ, मयुरी चौधरी, मनिष खुने, निलेश कापसे, अजय चुने, विनोद लहाने, मनोज शिंदे, महेमुद हुसैन, राजाभाऊ भैसे, बंडुभाऊ यादव, प्रसेनजित तेलंग, विनोद जोशी, रामदास कारमोरे, विजय रोडगे,गौतम जवंजाळ, पंकज गुडधे, बालु पठान, भीमराव बेरोड, महादेवराव शेंद्रे, भुषण नाचवणकर गजु चौधरी, गोपाल मुरायते, सचिन ठवकर आदींनी अथक परीश्रम घेतले. कार्यक्रमाला महेश देशमुख, नितीन उजगांवकर, सुरज देवहाते, राजेश भडांगे, दिपा रोंघे, कु. भालेराव, ममता बोरकर, आदेश राजनेकर, नागेश काळमेघ, अमित अलोने, निलेश टेवरे, प्रशांत डोर्लीकर, गजु चोरे यांसह असंख्य युवक वर्ग प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रबध्द संचलन बग्गी येथील प्रकाश चवाळे तर आभार प्रदर्शन सागर दुर्योधन यांनी केले.
त्या लोकप्रतिनीधींच्या जागा कशा तत्काळ भरता – प्रा. ठाकरे
प्राचार्य एस. एस. ठाकरे यांनी आपल्या भाषणातुन म्हटले की, खासदार, आमदार यांची जागा रिकामी झाल्यास त्या जागा ६ महिण्यातच पोट निवडणुका घेऊन तत्काळ भरल्या जातात. त्यासाठी कोणतेही आंदोलन किंवा मागणीची गरज नसते. त्याप्रमाणे देशात हजारो शासकीय पदे रिक्त असतांना व भरतीची वारंवार मागणी करीत असतांनाही त्याकडे दुर्लक्ष का?  असा महत्वाचा व लक्षवेधक प्रश्न प्राचार्य ठाकरेंनी उपस्थितांसमोर मांडला.