स्मार्ट गावांना २५ लाखाचे बक्षीस देणार

0
957
Google search engine
Google search engine

स्मार्ट गावांना २५ लाखाचे बक्षीस देणार

ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे

बीड: नितीन ढाकणे

दि.२८ ..राज्यातील स्मार्ट गाव स्पर्धेत विजेत्या गावांना २५१५ लेखाशीर्षातू २५ लाखाचे बक्षीस देण्यात येणार असल्याचे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे सांगितले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे लोकमत समुहाच्या वतीने आयोजित लोकमत सरपंच आवार्ड वितरण समारंभात त्या बोलत होत्या.

मंत्री मुंडे म्हणाल्या की,राज्यात स्मार्ट ग्राम योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेत सर्व भोगोलिक परिस्थिती असणा-या गावांना  सहभागी होता येत आहे. यामुळे मराठवाड्यातील मागास गावही स्पर्धेत भाग घेऊन बक्षिसे मिळवत आहेत.  बक्षीसांची रक्कम कश्याप्रकारे खर्च करण्यात यावा याची मार्गदर्शक सुचनाही देण्यात आले आहे.
मागील वर्षीच्या बक्षीसांची रक्कम आजच वितरित होत असल्याचे त्यांनी सांगितले.

मंत्रालयत सरपंच दरबार हा आनोखा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या सरपंच दरबारात सहभागी होणा-या संरपंचाकडून त्यांच्या गावातील समस्या, विकासकामे,सुचना ऐकून घेवून त्या सोडवण्यासाठी प्रयत्न केला जात आहे.सरपंच दरबारात महिला सरपंचासह पुरुष सरपंचांचा या उपक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.थेट सरपंच निवड करण्याच्या निर्णायाबद्ल सरपंचांनी या निर्णयाचे स्वागत केले.

सरपंचांनी गावाच्या विकासासाठी
लोकांना एकत्र करून गावाच्या समस्यांची प्राथमिकता ठरवून आलेल्या निधीचा योग्य वापर करावा आणि स्पर्धेत सहभागी होऊन बक्षीसे मिळवावीत असे आवाहन मंत्री मुंडे यांनी यावेळी सरपंचांना केले.