संतोष मानूरकर यांची स्काऊट -गाईड राज्य आयूक्त पदी नियुक्ती 

0
873
Google search engine
Google search engine

बीड जिल्ह्यात स्काऊट -गाईड चळवळ गतीमान करण्यात आली.

बीड: नितीन ढाकणे, दिपक गित्ते
-महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट -गाईड संस्थेच्या राज्य आयूक्त (स्काऊट) या पदावर बीड येथील पत्रकार संतोष मानूरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याच्या ग्रामविकास मंत्री ना. पंकजाताई मुंडे, स्काऊटचे  राज्याचे  अध्यक्ष  ज्ञानोबाजी मुंडे,राज्य  मुख्य आयूक्त भा. ई. नगराळे यांच्या हस्ते मानूरकर यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.
बीड जिल्ह्यात स्काऊट -गाईड चळवळ गतीमान करण्यात आली. अनेक उपक्रम राबवत  प्रत्येक शाळे पर्यन्त हि  चळवळ पोहोचवण्यात आल्यामुळे स्काऊटचा  बीड पॅट्रेन राज्यात अस्तित्वात आला.  या संपूर्ण कामाची दखल घेऊन बीड येथील जिल्हा मुख्य आयूक्त पत्रकार संतोष मानूरकर यांना राज्य कार्यकारिणी वर  काम  करण्याची संधी मिळाली आहे. राज्य आयूक्त (स्काऊट) या पदावर त्यांची  नियुक्ती झाली असून या संदर्भातील नियुक्ती पत्र नुकतेच मुंबई येथे मान्यवरांच्या   उपस्थितीत देण्यात आले.
या पूर्वीचे राज्य आयूक्त  (स्काऊट) व्ही. एस. काळे यांच्या राजीनाम्या  मुळे हे पद रिक्त झाले होते.  काळे यांच्या कडे आता चळवळीतील आणखी महत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे