श्री स्वयंभू महाविष्णु मंदिर प्रागटय सोहळया निमित्त कन्हेरवाडी येथे ह.भ.प. रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांचे काल्याचे किर्तन

0
1184
Google search engine
Google search engine
महाराष्ट्रातून व महाराष्ट्र बाहेरूनही भाविकांनी मुर्तीच्या दर्शनासाठी गर्दी सुरू
बीड :परळी वैजनाथ: नितीन ढाकणे
परळी-अंबाजोगाईचे काम सुरू असताना कन्हेरवाडी परिसराती मुरूमाचे खोदकाम सुरू होते त्यावेळी श्री स्वंयभू महाविष्णु यांची मुर्ती सापडली व मुर्तीचे रक्षण करताना नागदेवता होते. त्यामुळे महाराष्ट्रातून व महाराष्ट्र बाहेरूनही भाविकांनी मुर्तीच्या दर्शनासाठी गर्दी सुरू असून कन्हेरवाडी गावातील भाविकांनी मिळून त्याठिकाणाचे नामकरण विष्णुगड केले व तेथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोेजन करण्यात आले.
 ह.भ.प.गणेशानंद महाराज गुट्टे, ह.भ.प.बालाजी महाराज फड यांच्या मार्गदर्शनाखाली व समस्त गावकरी मंडळी व तरूण मंडळी यांनी सप्ताहाचे आयोजन केले आहे. तरी याठिकाणी ह.भ.प. केशव महाराज शास्त्री घुले, ह.भ.प. गोविंद महाराज मुंडे, ह.भ.प. सोपान महाराज सानप, ह.भ.प. भागवताचार्य तुकाराम महाराज मुंडे शास्त्री, ह.भ.प. डॉ. सुदाम महाराज पानेगावकर, ह.भ.प. अनिल महाराज पाटील (बार्शीकर) यांची किर्तने झाली असून आज काल्याचे किर्तन दि. 22 एप्रिल 2018 रोजी सकाळी 9 ते 11 यावेळेत होईल व किर्तनानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. श्री स्वंयभू महाविष्णुचे महाराष्ट्रातील पहिलेच मंदिर आहे त्यामुळे महाराष्ट्रातील विविध भागातून आलोट गर्दी उसळली आहे. तरी या काल्याचे किर्तनाचा व महाप्रसादाचा लाभ पंचक्रोशीतील भाविकांनी घ्यावा असे आवाहन समस्त गावकरी मंडळी व तरूण मंडळी श्रीक्षेत्र कन्हेरवाडी पंचक्रोशीतील यांनी केले आहे.