दिल्ली पब्लिक वर्ल्ड स्कूल चा पालक मेळावा उत्साहात संपन्न

296

ब्रिज कोर्से ची सुरवात, 4 जून पासून नियमीत शाळेला सुरवात चौकट

इंटर स्कूल स्टुडंट एक्सचेंज प्रोग्रॅम अंतर्गत शाळेतील पाच उत्कृष्ट विध्यार्थी दिल्ली च्या शाळेत व एक उत्कृष्ट विध्यार्थी सिंगापूरच्या शाळेत व तेथील दिल्ली पब्लिक वर्ल्ड स्कूल चे विध्यार्थी परळी च्या शाळेत पंधरा दिवस शिकण्यासाठी येतील-

बीड, परळी:नितीन ढाकणे:

:दिल्ली पब्लिक वर्ल्ड स्कूल परळी- बीड रोड तळेगाव मेथे पालकांसाठी पालक मेळावा आयोजित करण्यात आला होता या पालक मेळाव्यासाठी परळी तसेच परिसरातील पालकाचा भरभरून प्रतिसाद मिळाला. मा कार्यक्रमासाठी पुणे महानगर आयुक्त किरण गित्ते ,डॉ.राजाराम मुंडे,दिल्ली पब्लिक वर्ल्ड स्कूल चे मुख्याध्यापक तेजेशकुमार, प्रमोद पांडे,उपसभापती बालाजी (पिंटू) मुंडे,सभापती सूर्मभान मुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी किरण गित्ते साहेब  बोलताना  म्हणाले दिल्ली पब्लिक वर्ल्ड स्कूल चा विध्यार्थी हा फक्त पुस्तकी ज्ञान न मिळवता तो चांगला शास्त्रज्ञ,खेळाडू,वक्ता ,पत्रकार, क्रिकेटर, डॉक्टर, इंजिनीअर, आम ए एस, बनला पाहिजे त्यासाठी शालेय शिक्षणा सोबतच विविध उपक्रम घेण्यात येतील तसेच आपल्या भाषणातून त्यांनी या अर्थाने दिल्ली पब्लिक वर्ल्ड स्कूल मध्ये अंतरराष्ट्रीय लेवल च्या अभ्यासक्रमाची तयारी करून घेन्यात येईल असे सांगितले. या वेळी तेजेशकुमार मांनी दिल्ली पब्लिक वर्ल्ड स्कूल चा परिचय करून दिला.तसेच शाळेचे शिक्षक अश्फाक सर,उबेद सर,प्रसाद सर दीपा मॅडम,शुक्ला सर,सविता मॅडम,यांचा परिचम करून दिला व  तसेच दिनांक 23 एप्रिल पासून होणार्‍या ब्रिज कोर्स व 2018-19 शैक्षणिक वर्षा बद्दल माहिती दिली. यावेळी तळेगाव तसेच टोकवाडी येथील मान्यवरांनी शाळेसाठी मोलाचे सहकार्य केले त्या बद्दल त्यांचा सत्कार किरण गित्ते साहेब यांच्या हस्ते करण्यात आला त्यामध्ये माजी सरपंच दशरथ मुंडे,जगन्नाथ मुंडे,उपसरपंच तुकाराम काळे,राजाभाऊ मुंडे,बंडूशेठ काळे,वैजनाथ तांबडे,नारायण तांबडे इत्यादीचा सहभाग होता. मुलांना शाळेत येण्या-जाण्या साठी 9 बसेस व व्हॅनची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच आज दिल्ली पब्लिक स्कूलच्या विध्यार्थ्यांना पुस्तके आणि वह्या चे वाटप करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी आलेल्या सर्वांचे आभार  सौ वरदा पाठक मॅडम मांनी मानले तसेच या कार्यक्रमासाठी परळी तसेच परिसरातील असंख्य पालकांची उपस्थिती होती.

 

 

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।