भगवंताचे नाव तोंडात येण्यासाठी अनंत जन्माचे पुण्य लागते – रामायणाचार्य रामराव महाराज ढोक

479

सप्ताहाची सांगता रामायणाचार्य ... रामराव महाराज ढोक यांच्या काल्याच्या किर्तनाने झाली

बीड, परळी:नितीन ढाकणे

:मानवी जीवनाचा अंत समयी भगवंताचे नाव तोंडात येण्यासाठी अनंत जन्माचे पुण्य लागते तर साक्षात भगवंत पोटाला येण्यासाठी किंवा तो प्रकट होण्यासाठी पुण्याचा संयम लागतेा. परळी -अंबाजोगाई, कन्हेरवाडी गावाशेजारी स्वंयभू महाविष्णु प्रागटीकरण झाले आहे. त्याचे भव्य-दिव्य मंदिर उभारण्यासाठी परिसरातील भक्त भाविकांनी सहकार्य करावे असे आवाहन रामायणाचार्य ह.भ.प. रामराव महाराज ढोक यांनी केले. मंदिराच्या उभारणीसाठी ढोक महाराजांनी स्वतःचे पंचविस हजार रूपये रोख स्वरूपाची देणगी देऊन निधी संकलनासाठी सुरूवात केली.

परळी -अंबाजोगाई रस्त्यावर कन्हेरवाडी परिसरात काही दिवसांपूर्वी खोदकाम सुरू असताना श्री स्वंयभू महाविष्णु सापासह मुर्ती सापडली होती तेव्हापासून या जागेवर अखंड हरिनाम सप्ताह सुरू करण्यात आला होता.

आज त्या सप्ताहाची सांगता रामायणाचार्य ह.भ.प. रामराव महाराज ढोक यांच्या काल्याच्या किर्तनाने झाली. किर्तन सेवेसाठी ढोक महाराजांनी जगतगुरू वैराग्य मुर्ती देहू निवासी संत तुकाराम महाराजांचा संत या प्रकरणातील नामाचे महत्व विषद करणारा. विश्वाला जगिता म्हणे यशोदेशी माता ाा ऐसा भक्ताचा अंकीता लागे तैसी लावी प्रीत धु ाा हा अभंग घेतला होता. रामराव महाराज ढोक यांचे किर्तन ऐकण्यासाठी परळी तालुक्यातील वारकरी, गायक महाराज मंडळी मोठया संख्येने उपस्थित होते. किर्तनाची वेळ सकाळी 9 ची असतानाही महिला भाविकांची उपस्थिती लक्षणीय होती. वारकरी सांप्रदायतील भागवताचार्य ह.भ.प.गणेशानंद महाराज गुट्टे, भागवताचार्य ह.भ.प. गोविंद महाराज मुंडे, ह.भ.प. बालाजी महाराज फड, ह.भ.प. वासुदेव महाराज मुंडे, ह.भ.प. विश्‍वास महाराज पांडे, ह.भ.प. बंडोपंत महाराज ढाकणे, सोपान महाराज गित्ते, ह.भ.प. भरत महाराज सोडगीर, ह.भ.प. बालकिर्तनकार प्रकाश महाराज फड, परळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती बंकटरावजी कांदे, प्रदिप खाडे, ज्ञानोबा माऊली फड, प्राचार्य प्रा.बि.डी.मुंडे सर, काहुरचे संपादक शंकर इंगळे आदि मान्यवयरांची उपस्थिती होती. वारकरी सांप्रदायात सामान्य जीवाचा जन्म होत असतो तर भगवंत अवतार रूपाने प्रकट होत असतो. कन्हेरवाडी गावात श्री स्वंयभू महाविष्णु मुर्ती रूपाने प्रकट झाले आहे.  त्यामुळे सुरू झालेल्या अखंड हरिनाम सप्ताह हा आनंदाचा सोहळा आहे. भगवंताच्या प्रागटीकरणाचा सोहळा करण्यासाठी भाग्य लागते असे प्रतिपादन रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांनी केले. त्यानंतर महाप्रसादाचा लाभ पंचक्रोशीतील भाविक, भक्तांनी घेतला. यावेळी समस्त गावकरी मंंडळी व तरूण मंडळी श्री क्षेत्र कन्हेरवाडी येथील भाविक भक्त मोेठया संख्येने उपस्थित होते.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।