काली-पिली व कारची समोरासमोर धडक – अपघातात सात जण ठार : चार जखमी

0
1722
Google search engine
Google search engine

दोन लहान बाळांसह सात जणांचा मृत्यू

अहेरी /गडचिरोली
काळीपिवळी व बलेनो वाहनाची समोरासमोर धडक होवून झालेल्या भीषण अपघातात दोन बालकांसह सात जण जागीच ठार झाल्याची घटना आज सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास अहेरी तालुक्यातील जिमलगट्टा गावापासून ५ किलोमीटरवर असलेल्या गोविंदगावच्या बस थांब्याजवळ घडली.

मृतांमध्ये कमल मारोती मित्तलवार (३५), मारोती केशवराव मित्तलवार (६०), लता मारोती मित्तलवार (५५), श्रीनीता कमल मित्तलवार (५ महिने), सरस संदीप मित्तलवार (दीड वर्ष) तसेच गडचिरोली तालुक्यातील मुरखळा येथील रहिवासी असलेले काळीपिवळी वाहनातील निखिल देवराव मोहुर्ले (२८), चालक संदीप आनंदराव गडप (४०) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत. याशिवाय सीमा कमल मित्तलवार, अर्चना संदीप मित्तलवार, त्रिशा सुधीर अक्केवार, प्रतिमा देवराव मोहुर्ले आणि देवराव सखाराम मोहुर्ले अशी जखमींचे नावे आहेत. त्यांना अहेरीच्या उपजिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले.

अपघातात बलेनो वाहन क्रमांक एम एच 34 बीएफ 4861 चा समावेश आहे. तर काळी पिवळी वाहन क्रमांक एम एच 34 – 0791 आहे.