पोलिसांच्या अंगावर गाडी घालून ठार मारण्याचा प्रयत्न करणारा आकोट शहर पोलिसांच्या जाळ्यात

0
1133
Google search engine
Google search engine

आकोट – नाकाबंदीवर असणाऱ्या चांदुर रेल्वे पोलिसांच्या अंगावर गाडी घालून ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्यासआकोट शहर पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले असुन त्यास चांदुर रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पोलिस सुञांनुसार दिनांक 5 जुलै20018 रोजी अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे पोलिसांना खात्रीलायक माहिती मिळाली की नांदगाव कडून एका पांढऱ्या बोलेरो पिकअप वाहना मधून जनावरांची अवैध वाहतूक होत आहे.ह्या माहितीवरून चांदूर रेल्वे पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक लसंते, पोलिस हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत मालोदे व स्टाफ बॅरिकेट लावून नांदगाव कडून येणाऱ्या रोड वर नाकाबंदी करीत असतानाच एक पांढऱ्या रंगांची बोलेरो पिकअप MH 27 X 8212 ही भरधाव वेगाने येत असलेली दिसल्याने तिला थांबविण्या साठी हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत मालोदे व पोलिस कॉन्स्टेबल गणी ह्यांनी बॅरिकेट लावून प्रयत्न केला असता वाहन चालकाने भरधाव वेगाने वाहन पोलिसांच्या अंगावर घालून त्यांना जीवाने मारण्याचा प्रयत्न केला ,पण पोलिसांनी प्रसंगावधान दाखवून बाजूला उडी मारल्याने ते किरकोळ जखमी झाले, त्यांनी पोलिस वाहनाने सदर बोलेरो वाहनाचा पाठलाग केला पण आरोपी वाहना सह फरार झाले चांदूर रेल्वे पोलिसांनी अमरावती ग्रामीण व अमरावती शहर पोलीसांना घटनेबाबत व वाहना बाबत माहिती देऊन सदर वाहन पकडण्यास काळविल्या वरून शहरा सह अमरावती जिल्ह्यात नाकाबंदी केली असता सदर वाहन फ्रेजारपुरा पोलिसांनी बडनेरा हद्दी मधून 12 जनावरा सह ताब्यात घेतले पण आरोपी फरार होते, ह्या प्रकरणी चांदुर रेल्वे पोलिस स्टेशन येथे पोलिसांना अंगावर वाहन घालून जिवे मारण्याचा गुन्हा कलम 307,353, 323 IPC तसेच मालमत्ता नुकसान प्रतिबंधक कायदा, प्राण्यास निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंध कायदा, व प्राणी सौरक्षण अधिनियमाच्या विविध कलमे लावून फिर्यादी चंद्रकांत मधुकर मालोदे पोलिस हेड कॉन्स्टेबल चांदुर रेल्वे पोलिस स्टेशन ह्यांचे फिर्यादी वरून गुन्हा दाखल करण्यात येऊन त्या मध्ये 2 आरोपी निष्पन्न करण्यात आले होते. त्या पैकी एक आरोपी अकोट येथे आल्याची गुप्त बातमी प्राप्त झाल्यावरून शहर पोलिस निरीक्षक गजानन शेळके ह्यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानोबा फड, हेड कॉन्स्टेबल संजय घायल, पोलिस कॉन्स्टेबल पठाण ह्यांनी त्याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेऊन सदरची माहिती चांदुर रेल्वे पोलिसांना देऊन नमूद आरोपी शेख फाजील शेख अन्सार रा तरखेडा,पठाण चौक, नागपुरी गेट पोलिस स्टेशन अमरावती ह्याला नमूद गुन्ह्याचे तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक लसंते पोलिस स्टेशन चांदुर रेल्वे जिल्हा अमरावती ह्याचे ताब्यात देण्यात आले.