लासलगाव येथील जिजामाता प्राथमिक शाळेत दप्तरमुक्त शनिवार उपक्रम.

0
827
Google search engine
Google search engine

नाशिक / प्रतिनिधी

कार्यानुभव व कला विषय अंतर्गत आज दि.४/८/२०१८रोजी संस्थेच्या मुख्य कार्यकारी वैष्णवी पाटील यांचे संकल्पनेतुन व मुख्याध्यापक अनिस काजी यांच्या मार्गदर्शनाखाली संगित व कागदकाम कार्यशाळा इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजीत करण्यात आली. परिपाठात इ.४ थी अ ची विद्यार्थीनी देवयानी चव्हाणके या मुलीने होर्मोनिअम वाजवुन मनमोहक सुमधुर गवळनी व हिंदी, मराठी गीते सादर करून सर्वांची मने जिंकुन घेतली.सर्व शिक्षकांनी प्रत्येक इयत्तेत कागदकाम करून घेतले.विद्यार्थ्यांनी कागदी होडी,नांगर होडी इत्यादी वस्तू बनविल्या. विविध कविता, कृतीयुक्त गीत म्हटली.दप्तरमुक्त शनिवार हा उपक्रम दोन दिवस अगोदर जाहीर केल्यामुळे विद्यार्थी उपस्थिती वाढली असे मनोगत उपशिक्षक समीर देवडे यांनी व्यक्त केले.मुख्याध्यापक अनिस काजी व मुख्य कार्यकारी अधिकारी वैष्णवी पाटील यांनी प्रत्येक वर्गात भेट देत उपक्रमाची पाहणी केली.स्वता प्रात्याक्षिकामदे सहभाग घेत मुलांना कागदी होडी बनवुन दाखवत मार्गदर्शन केले व सर्व विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन केले. देवयानी चव्हाणके या मुलीला बक्षिस देवुन तिचे अभिनंदन करण्यात आले.

या प्रसंगी उपशिक्षक कैलास भामरे,दिलीप शिरसाट,सुहास बच्छाव, समीर देवेडे, राजाराम जाधव, केदुबाई गवळी, हर्षदा बच्छाव,योगीराज महाले,बद्रिप्रसाद वाबळे,बाळासाहेब वाजे या सर्वांनी सक्राय सहभाग घेत कार्यशाळा यशस्वी केली.शाळेत हा नाविन्यपुर्ण उपक्रम राबविल्या बद्दल संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब पाटील, उपाध्यक्ष निवृत्ती गायकर, सचिव संजय पाटील, पुष्पाताई दरेकर,पं.स.सदस्या रंजनाताई पाटील, निताताई पाटील,संचालक शंतनु पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी वैष्णवी पाटील यांनी मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले.