सकल मराठा समाज नाशिक मराठा क्रांती मोर्चा वतीने निफाड मतदारसंघ आमदार अनिल कदम यांच्या संपर्क कार्यलय येथे ठिय्या आंदोलन.

0
796
Google search engine
Google search engine

निफाड /प्रतिनिधी
सकल मराठा समाज नाशिक मराठा क्रांती मोर्चा वतीने ओझर येथील आमदार अनिल कदम यांच्या संपर्क कार्यालय येथे मोठ्यासंख्येने ठिय्या आंदोलन करण्यात आलं. निफाड तालुक्यातील सर्व राजकीय मराठा समाज बांधव यांनी देखील ठिय्या आंदोलनाला मोठ्या प्रमाणावर उपस्तीत लावली. त्याठिकाणी अनेक समन्वयकानांनी शासना मागण्यांना दिरंगाई करत आहे अशी खतखत व्यक्त करत भाषण केली. बोलताना समन्वयकांनि उल्लेख केला की अनिल कदम यांनी अनेक वेळा आरक्षनाच्या संदर्भात विधानसभेत आवाज उठवला त्याबद्दल त्यांचं समाजाने कौतुक केलं होतं. आरक्षणाच्या संदर्भात शासनाच्या स्तरावर अनेक घडामोडी चालू झाल्यात आहे. याच दिरंगाई होऊ नये म्हणून आमदार अनिल कदम यांनी याच्या सह अनेक आमदारांनी बंड करायला हवा. तेव्हाच समाजाला न्याय मिळेल अन्यथा समाज मराठा म्हणून आपल्या विरोधात बोलायला / मतदान करण्यासाठी मागेपुढे पहाणार नाही अशी भूमिका समाज बांधवांनी मांडली.

त्याला अनुसरून आमदार अनिल कदम यांनी आंदोलनकर्तना भेटून आंदोलनात बैठक मांडून सहभागी झाले. आमदार कदम यांनी आपल्या भाषणात संघीतल मी राजीनामा देणार नाही, कारण ज्या लोकांनी मला प्रतिनिधित्व करायला लावलं त्यांचा मी पाईक आहे. मराठा समाजाला आरक्षण भूमिका मी अनेकवेळा विधानसभेत आवाज उचला आहे.आणि मी पुढेही आवाज उठवत राहणार आहे. माझी भूमिका ही स्पष्ट आहे खचलेला, पिचलेल्या समाज त्याला त्याचा आधिकार हक्क मिळायला हवे.आणि आता आक्रमण आंदोलन करून उपयोग नाही.आता अभ्यासपूरक लढाई लढावी करावी लागेल. जेणे करून लवकरात लवकर निर्णय घेता येईल. अनेक अदृश्य शक्ती यात काम करून ते वेगळ्यापद्धतीने आंदोलन करू पाहत आहे. ते षड्यंत्र यशस्वी तरुणांनी होऊ देऊ नये अन्यथा जातीय लढाया,संघर्ष तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे.आपण सर्व घटनेला मानणारे लोक आहोत. त्या घटने प्रमाणे आपन गेलो पाहिजेत. हिंसा करून हक्क मिळणार नाही फक्त दखल घेतली जाईल. आपल्याला हक्क मिळाले पाहिजेत म्हणून आपण शांततेच्या, संयम भूमिका ठरवली नाशिक जिल्हा क्रांती मोर्चा ती योग्य आहे. आणि याच मार्गाने आपली लढाई लढावी आपल्यला लवकर सर्व गोष्टींचा पुरता होईल त्यासाठी आम्ही वरती बोलू लढावू वृत्तीने काम करू. यास विश्वास आपल्याला देतो.

तसेच तालुक्यात ज्या मुलांनावर आंदोलनाचे गुन्हे दाखल झाले आहे. ते तात्काळ मागे घ्यावे असे निवेदन तहसीलदार व पोलीस उपअधीक्षक अतुल झेंडे यांना आमदार अनिल कदम यांनी आंदोलनस्थळी दिलं.

त्यावेळी मराठा समन्वयक सकल मराठा समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता