मोठी बातमी: आमदार बच्चू कडूंना दोन वर्षांची शिक्षा …..? ; पहा काय आहे प्रकरण

0
6372
Google search engine
Google search engine

२०१७ साली अपंग लोकांनी नाशिक महापालिका आयुक्तांविरोधात आंदोलन केलं होतं. अपंगांसाठी असलेला निधी महापालिका आयुक्तांनी खर्च केला नव्हता, असा आरोप त्यांच्यावर होता. त्यामुळे दिव्यांग लोकांनी नाशिक महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्याविरोधात आंदोलन केलं. पण या आंदोलनाची दखल महापालिका आयुक्तांनी घेतली नाही.

त्यामुळे आमदार बच्चू कडू अपंगाच्या समस्या घेऊन महापालिका आयुक्तांच्या दालनात गेले. अपंगाच्या मागण्या मांडत असताना बच्चू कडू आणि महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्यात बाचाबाची झाली. यावेळी बच्चू कडू यांनी आयुक्तांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी २०१७ साली बच्चू कडू यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणावर नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी सुरू होती. अखेर आज न्यायालयाने बच्चू कडू यांना शिक्षा सुनावली आहे .