धर्मापूरी प्रतिनिधी |
(दि.०६) धर्मापूरी येथे श्री.क्षेत्र भगवानगडाचे संस्थापक राष्ट्रसंत भगवानबाबा यांची १२२ वी जयंती भक्तीभावाने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सकाळी गावातील व परिसरातील असंख्य भगवानबाबा भक्तांनी गावातून मोटारसायकल रॅली काढून भागवानबाबांच्या प्रतिमेला अभिवादन केले व नंतर टाळ-मृदंग तसेच लेझीम पथकाच्या गजरामध्ये गुरुवर्य श्री संत भगवानबाबांच्या प्रतिमेची सर्व आनंदी वातावरणामध्ये भव्य मिरवणुक काढली.
संत भगवानबाबांचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी धर्मापूरी येथील काही तरुणांनी पुढाकार घेवून संत भगवानबाबा प्रतिष्ठापाना मार्फत गावातील व परसिरातील तरुणांना एकत्र करून समाज क्रांतीचे काम केले जात आहे. याच माद्यामातून जयंतीनिमित्त गावातून भव्य मिरवणूक व मोटारसायकल रॅली काढण्यात आली होती गावातील सर्व महिलांनी आपापल्या दारात सडा-रांगोळी काढल्या होत्या. त्यानंतर गावकऱ्यांनी बाबांची आरती केली व शेवटी गुरुवर्य श्री संत भगवानबाबांच्या जयघोषाने कार्यक्रमाचा समारोप झाला या सर्व कार्यास भगवानबाबा प्रतिष्ठापानाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्यकर्ते व गावातील नवतरुणांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमास धर्मापुरी व परिसरातील भविक उपस्तीत होते.