परळी अंबाजोगाई रस्त्याच्या दर्जाबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह ! – प्रा.अतुल दुबे

0
748
Google search engine
Google search engine

परळी वैजनाथ (प्रतिनिधी ). –

गेल्या वर्षाच्या ऑक्टोबर महिन्यापासून सुरू असलेल्या परळी-पिंपळा या रस्त्याच्या कामाच्या दर्जाबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.संथगतीने सुरू झालेल्या या कामाला गती येत असतानाच या रस्त्याच्या कामात भरावासाठी मुरुमाऐवजी बांधकामाचे टाकाऊ साहित्य वापरात घेत असल्याची धक्कादायक माहिती शिवसेना युवक नेते प्रा.अतुल दुबे यांनी दिली आहे.आधीच अतिशय संथ गतीने होत असलेल्या या रस्त्यामुळे परळी- अंबाजोगाई जाणारे-येणारे येथील नागरिक त्रस्त आहेत.

परळीत वैद्यनाथ कॉलेज, परळी समोर रस्त्याच्या कामात भराव टाकण्यासाठी मुरूम वापरण्याऐवजी चक्क बांधकामाचे टाकाऊ साहित्य टाकल्याचे दिसून आल्याने रस्त्याचा दर्जा ढासळत आहे. यामुळे या रस्त्याच्या कामाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असल्याची माहिती शिवसेना युवक नेते प्रा.अतुल दुबे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. याबाबत शासनाने गंभीर दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी असेही त्यांनी म्हटले आहे.परळीत अब्दुल कलाम चौक ते बँक कॉलनी या रस्त्यावर शासकीय कार्यालय विद्यालय आणि महाविद्यालय आहेत, दोन्ही बाजूने रस्ता उकरून ठेवल्याने या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात धुळीचे साम्राज्य पसरलेले आहे. रस्त्यावरील धूळ उडू नये यासाठी पाणी टाकून क्यूरींग करावी,रस्त्याच्या कामाबाबत दिशादर्शक लावावेत असेही या पत्रकात प्रा अतुल दुबे यांनी म्हटले आहे.अन्यथा याबाबत मोठे आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.