जलबचतीसाठी पाणीदार योगदान देत धडधाकटांना लाजवणारा दिव्यांग जलदुत

0
1374
Google search engine
Google search engine

तेल्हारा (संतोष विणके) – बावन्न नदीनाल्यांच्या प्रवाहाने खळखळणारा तेल्हारा तालुका मोठ्या प्रमाणावर भुजल उपशाने दुष्काळाच्या गडद छायेत आहे.त्यामुळं यंदा पहील्याच वर्षी तेल्हारा तालुक्यात पाणी अडवण्यासाठी श्रमदानाचं तुफान तालुक्याच्या गावागावात आलं.अनेक जलदुतांनी पाण्याच्या संपत्तीसाठी मोठं श्रमदान केलं.या श्रमदानात असा एक जलदुत होता जो ना चालु शकत होता ना धढ स्पष्ट बोलु शकत होता तरी देखील या दिव्यांग जलदुतांचं पाणीदार योगदान हे महाश्रमदाना पेक्षाही मोठं ठरावंअसं आहे.हीवरखेड ता.तेल्हारा जि.आकोला येथील दिव्यांग जलदुत ज्ञानेश्वर गावंडे या ३० वर्षे वय असणाऱ्या तरुणाने धडधाकटांना लाजवेल असे योगदान देत पाण्याचं मोल सामान्यांना पटवुन देलं.ज्ञानेश्वर यांना शारीरीक आव्हान असतांना श्रमदानात सहभाग घेतला.ते ही उन्हाचा पारा ४५ च्या घरात असतांना .ते एवढ्या वरच थांबले नाही तर जेसीबीने करावयाच्या कामासाठी लागणाऱ्या डीझलसाठी देखील त्यांनी आर्थिक सहाय्य केले.पाण्याचा बेसुमार वापर करणाऱ्या शहर वासियांना ज्ञानेश्वरने शारीरीक आव्हान असतांना दिलेले योगदान ही मोठीच चपराक आहे.पाण्याच्या चळवळीतला दुर्लक्षित ऊपेक्षित अन बेदखल असलेला ज्ञानेश्वर गावंडे हा खरा वाॕटर हीरो आहे.माञ दुर्दैवाने प्रसिद्धीपासुन अलिप्त राहलेला ज्ञानेश्वर हा जगासमोर यावा पाणी अडवण्याची त्याची धडपड समोर यावी यासाठीच विदर्भ24न्युज ची विशेष मालिकेच्या भाग २ मधुन आम्ही या दुर्मिळ अश्या जलदुताला बहाल करत आहोत .करी रुपागड सारख्या डोंगराळ भागात आपल्या मिञ सहकारी यांच्या मदतीमुळं पाणी अडवण्याचं पविञ कार्य करता आलं असं तो बोलतांना म्हणाला.त्याच हे कार्य अमिर खान यांच्या पेक्षाही मोठं ठरावं एवढं महान आहे.अश्या या दुर्मिळ जलदुताला सलाम..