श्रावण सरीमुळे परळीतकरांत आनंद

0
829
Google search engine
Google search engine

बीड: नितीन ढाकणे

राज्यातील अनेक भागात बऱ्याच दिवसापासून पावसाची सर्वजण प्रतीक्षा करत होते, वारंवार येणारे ढग परंतु पाऊण न होताच पुढे जायचे त्याच बरोबर
परळीतील अनेक भागात पाण्याचा ऐन पावसाळ्यात प्रश्न निर्माण झाला होता.परळीत फक्त जून च्या सुरुवातीला पाऊस चांगला झाला परंतु त्यानंतर खुप दिवस पावसाने दांडी मारली, त्यामुळे शेतकरी, व्यापारी, आणि सर्वसामान्य या सर्वांमध्ये पावसाबद्दल चातका प्रमाणेच व्याकुळता होती, परंतु 15 ऑगस्ट च्या मध्यरात्री 2 च्या सुमारास पावसास सुरुवात झाली आणि कमी अधिक प्रमाण मध्ये 16 तारखेच्या पहाटे पर्यंत पाऊस कायम सुरू आहे.

या वेळी गंगाधर सळवींच्या काही सुरेख ओळी आठवतात

पोरं रस्त्यावर थिरकायची पावसात
आम्ही मात्र भिजायचो घरच्या घरात
तुडुंब शेत, पाणी भरायचं नदी-नाल्यात
आमचे टोप भरायचे-भरायची पिठाची परात
छत्री कुठली? गोणपाटाचं खोलडं
कपडे भिजायचे, काहीच नसायचं कोरडं
रपा-रपा मातीत पाय
फटीतून बोटांच्या चिखल यायचा वरती
तरीही धुंद सारे-तृप्त व्हायची धरती.