शुभकल्याण मल्टीस्टेटच्या माध्यमातून लावला ठेवी दारांना चुना.

0
872
Google search engine
Google search engine

दिलीप आपेटला शुक्रवारी पुण्यातून अटक

शुभकल्याण मल्टीस्टेटच्या माध्यमातून लावला ठेवी दारांना चुना.

आरोपीने कारखानदारी व मल्टिस्टेट मधील मोठा घोटाळा केला.

आपेट 2 वर्षांपासून फरार होता.

नोटबंदीनंतर आपेट फरार.

१८ टक्के दरानं व्याज देण्याचं आमिष दाखवून कोट्यवधी रुपये जमा केले.

बीड जिल्ह्यातील ठेवीदाराना 10 कोटी रुपयाला फसवणूक केल्याचा आरोप त्याच्यावर आहे.

विविध १० पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल झाले आहेत.

शुभ कल्याण मल्टीस्टेट पतसंस्थेने ठेवीदारांना जास्त व्याज देण्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली आहे.

पोलिस प्रशासनाने अखेर आपेटला पुण्यात अटक केली

==============================

बीड :
शुभ कल्याण मल्टीस्टेट पतसंस्थेने ठेवीदारांना जास्त व्याज देण्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांना फसवले आहे. बीड पोलिसांच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेने दिलीप आपेटला शुक्रवारी पुण्यातून अटक केली होती. शनिवारी अंबाजोगाई न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.
शुभ कल्याण मल्टीस्टेट पतसंस्थेच्या माध्यमातून मराठवाड्यासह अनेक ठिकाणी शाखा उघडून दिलीप आपेटने हजारो  ठेवीदारांची फसवणूक केली.
एकट्या बीड जिल्ह्यात अंदाजे १० कोटींच्यावर घोटाळा केल्याचा आरोप आपटेवर असून जिल्ह्यात विविध १० पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. आपेटला अटक करुन पहाटे 3 वाजता बीड मध्ये आणल्याची माहिती मिळाली आहे.
दरम्यान परळीसह उस्मानाबाद आणि भूम तालुक्यातल्या अनेकांना कोट्यवधी रुपयांना गंडवुन पळून गेलेल्या आपेटला अटक करावी या मागणीसाठी आपेटविरुद्ध पोलिस प्रशासनासह, जिल्हा प्रशासनाच्या समोर ठेवीदारांनी आमरण उपोषणा केले होते.
आपेटनं १८ टक्के दरानं व्याज देण्याचं आमिष दाखवून कोट्यवधी रुपये जमा केले. मात्र नोटबंदीनंतर आपेट फरार झाला. पोलिस प्रशासनाने अखेर आपेटला पुण्यात अटक केली आहे.