*एकलविहिर शिवारात विद्युत तंत्रज्ञाचा विजेचा धक्का लागून मृत्यू*

0
1159
Google search engine
Google search engine

वरुड(अतुल काळे) –

नजीकच्या एकळविहिर शेत शिवारातील जिचकार यांच्या शेतात असलेल्या रोहित्रा वर काम करीत असताना अचानक विद्युत तंत्रज्ञाला विजेचा धक्का लागून जागीच मृत्यू झाला.दरम्यान ही माहिती मिळताच वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पोलिसांना माहिती दिली.पोलिसांनी रोहितरवर लटकलेला मृतदेह काढून उत्तरीय तपासणी करिता ग्रामीण रुग्णालयात आणला या घटनेमुळे विज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ माजली.

एकलविहिर येथे कृषी पंपाच्या विद्युत पुरवण्या करीता 11 के.व्ही पुरवठा असणारे रोहित्र आहे. या रोहित्रा वरून कृषी पंपाना विद्युत पुरवठा केला जातो.जिचकार याच्या शेतात रोहितराचे दुरुस्ती चे काम सुरू असताना विजेचा धक्का लागला आणि जिवंत विद्यत तारेला मृतक सतीश मोतीराम काळे यांचा स्पर्श झाल्याने तारेला चिपकुन जागीच ठार झाले. लटकलेल्या अवस्थेत पाहून परिसरातील शेतकरी धावून आले. व ही माहिती वीज वितरण कंपनी च्या अधिकाऱ्यांना दिली.मृतक सतीश मोतीराम काळे 51 रा.तळेगाव मोहना ता.चांदुरबाजार,जी :अमरावती .हल्ली मुक्काम पुसला सादर मृतक हे पुसला वीज वितरण कंपनीचे उपकेंद्रामध्ये कार्यरत होते. घटनेची माहिती मिळताच कनिष्ठ अभियंता वैष्णव तसेच विज कर्मचारी घटनास्थळी पोहचले तर पोलिसांना माहिती दिल्यावरून वीट जमादार दिलीप वासनकर, प्रवीण चौधरी सह यांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी करिता आणला.प्रसंगी वीज वितरण कंपनीच्या उपकार्यकरी अभियंता विनोद काळे सह आदी अधिकाऱ्यांनी भेटी दिल्या .