महाराष्ट्र प्रदेश पंचायत परिषदेच्या युवा तालुका अध्यक्षपदी सौरभ इंगळे – तालुका प्रमुख अनुप दुबे तर सचिवपदी अंकुश खाडे यांची वर्णी

0
1364
Google search engine
Google search engine
चांदूर रेल्वे – (शहेजाद खान ) 
    अखिल भारतीय पंचायत परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश पंचायत परिषद, धामणगाव रेल्वे – चांदूर रेल्वे विधानसभा क्षेत्राच्या युवा तालुका अध्यक्षपदी सौरभ प्रभुराज इंगळे यांनी नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे.
     महाराष्ट्र प्रदेश पंचायत परिषद ही शहरी व ग्रामिण भागातील पंचायत राज संदर्भातील शेतकरी, शेतमजुर आणि कामगारांच्या प्रश्नांसोबतच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातुन ग्रामिण व शहरी भागांचा विकास करण्यासाठी कार्य करते. या पंचायत परिषदेची चांदूर रेल्वे कार्यकारीणी नुकतीच घोषीत करण्यात आली. यामध्ये युवा तालुका अध्यक्षपदी सौरभ प्रभुराज इंगळे, तालुका प्रमुख अनुप दुबे, तालुका उपाध्यक्ष योगेश सहारे, तालुका महासचिव आसीफ पठान, तालुका सचिव अंकुश खाडे, तालुका कोषाध्यक्ष मोहन राठोड, तालुका सह कोषाध्यक्ष विनोद नागरिकर, तालुका युवा महासचिव मयुर दुबे यांची वर्णी लागली आहे. सगळ्यांना प्रदेश सचिव सुमित गुप्ता यांच्या स्वाक्षरीचे नियुक्तीपत्र बहाल करण्यात आले. नियुक्तीनंतर आता आपल्या कार्यातुन निश्चितच समाज घटकांच्या हितासाठी ग्राम स्वराज्याच्या माध्यमातुन ग्राम विकास, विधायक व रचनात्मक कार्यासाठी सहकार्य करणार असल्याचे नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.