इलेक्ट्रीक करंट लागुन युवकाच्या मृत्यु प्रकरणात पोलीसांचे पुरावे गोळा करणे सुरू – सद्यास आरोपीला अटक नाही

0
689
Google search engine
Google search engine
चांदूर रेल्वे – (शहेजाद खान ) 
चांदूर रेल्वे तालुक्यातील धोत्रा येथील २२ वर्षीय युवकाला इलेक्ट्रीक करंट लागुन मृत्यु झाल्याच्या प्रकरणात तळेगाव दशासर पोलीस पुरावे गोळा करीत असुन आरोपीला अटक करण्यात आलेली नाही.
चांदूर रेल्वे जवळील धोत्रा गट ग्रामपंचायच्या सरपंचाचा पती आरोपी शरद विजय कणसे (३०) ग्रामपंचायत संबंधित कामे करून घेत असतांनाच पंकज अशोक गोंडाणे (२२) याला आरोपी शरद कणसे याने इलेक्ट्रीक पोलवर लाईट लावायचे आहे म्हणुन सोबत चलण्यास सांगितले. आरोपीने डीपीवरून लाईन बंद केल्याची खात्री देऊन लाईट लावण्याकरिता पंकज गोंडाणेला पोलवर चढविले असता इलेक्ट्रीक करंट लागुन तो पोलवरून खाली पडला. व जागेवरच पंकज गोंडाणेचा मृत्यु झाला. आरोपी शरद कणसे याने पोलवरची लाईन बंदच केली नसल्यामुळे आरोपी शरद कणसे याने पंकज गोंडाणेला जिवे मारण्याचा कट आखुन लाईन बंद केल्याची खोटी खात्री देऊन खुन केल्याची लेखी तक्रार मृतकाचे काका सोमेश्वर बापुराव गोंडाणे (४२) यांनी तळेगाव दशासर पोलीसांना दिली होती. तळेगाव दशासर पोलीसांनी आरोपी शरद विजय कणसे विरूध्द भादंवी कलम ३०४ अन्वये गुन्हा दाखल केला होता.यानंतर पोलीसांनी पुरावे गोळा करणे सुरू केले असुन पुरावे गोळा झाल्यानंतर आरोपीला अटक करणार असल्याचे तळेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक शिवाजी राठोड यांनी सांगितले. प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार उपाध्याय यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय शिवाजी राठोड करीत आहे.