अकोट मतदार संघात प्रशासनाचे मतदार जनजागृती अभियान EVM तथा V V PAT प्रशिक्षण

0
947
Google search engine
Google search engine

आकोट/प्रतिनीधी

अकोट मतदार संघात प्रशासनाचे वतीने मतदार जनजागृती अभियान राबवण्यात येत असुन सोबतच मतदारांना
EVM तथा V V PAT प्रशिक्षण देखील दिल्या जात असल्याचे प्रशासनाने कळवले आहे. यांअंतर्गत दि.29 डीसे.रोजी अकोट तालुक्‍यातील चंडीकापुर, वडाळी देशमुख, पणज, धामणगाव, दिवठाणा व अकोली जहॉंगीर तसेच तेल्‍हारा तालुक्‍यातील हिवरखेड येथे EVM/V.V.P.A.T. मतदार जनजागृती कार्यक्रमाबबात नागरीकांना प्रशिक्षण देण्‍याचा कार्यक्रम पार पडला.

या कार्यक्रमामध्‍ये असंख्‍य मतदारांनी सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे यशस्‍वीतेकरिता आधिच सर्व गावांमध्‍ये तलाठी व मतदान केन्‍द्रस्‍तरीय अधिकारी (BLO) यांचे मार्फत मुनादीने प्रसिध्‍दी देण्‍यात आली होती.
या कार्यक्रमादरम्‍यान मा.विभागीय आयुक्‍त अमरावती विभाग अमरावती यांचे प्रतिनीधी म्‍हणुन श्री.प्रमोद देशमुख उपआयुक्‍त (पुनर्वसन), विभागीय आयुक्‍त अमरावती यांनी EVM/V.V.P.A.T. मतदार जनजागृती कार्यक्रमाचे वडाळी देशमुख, पणज व हिवरखेड येथे भेट देवून तपासणी केली.

यावेळी मा.श्री.उदय राजपुत, मतदार नोंदणी अधिकारी 028-अकोट विधानसभा मतदार संघ तथा उपविभगीय अधिकारी अकोट, मा.श्री.संतोष येवलीकर, तहसिलदार तेल्‍हारा, मा.श्री.राजेश गुरव, नायब तहसिलदार अकोट,मा.श्री.दिपक जरे, नायब तहसिलदार तेल्‍हारा, श्री.अवारे अव्‍वल कारकुन तेल्‍हारा, श्री.सिध्‍दांत वानखडे संगणक परिचालक, अकोट, श्री.नंदकुमार पचांग संगणक परिचालक, तेल्‍हारा व सर्व EVM/V.V.P.A.T. प्रशिक्षण चमु हजर होते.

तसेच सोमवार दिनांक 31/12/2018 रोजी अकोट तालुक्‍यातील मक्रमपुर, उमरा, लाडेगाव, पिंप्री खु., बेलुरा, खैरखेड, एदलापुर, नेव्‍होरी तसेच तेल्‍हारा तालुक्‍यातील हिवरखेड येथील 11 मतदान केन्‍द्रांमध्‍ये EVM/V.V.P.A.T. चे प्रशिक्षण मतदारांना देण्‍यात येणार आहे. या प्रशिक्षणाचा सर्व मतदारांनी लाभ घ्‍यावा असे आवाहन मा.श्री.उदय राजपुत, मतदार नोंदणी अधिकारी 028-अकोट विधानसभा मतदार संघ तथा उपविभगीय अधिकारी अकोट यांनी केले आहे.