तासगाव मुंबई एसटी चे सांगली जिल्ह्यातील नेवरीत ता.कडेगांव येथे स्वागत

0
1183
Google search engine
Google search engine

तासगाव डेपो ने सुरू केलेल्या तासगाव मुबई व्हाया विटा, पुसेसावळी, रहिमतपूर सातारा या एसटी चे सांगली जिल्ह्यातील नेवरी ता कडेगाव येथे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय विभूते, सरपंच मोहन सूर्यवंशी,भाजप तालुका उपाध्यक्ष जगदीश महाडीक, किरण चव्हाण उपस्थित होते.यावेळी विभूते म्हणाले, या भागातून मागील काही वर्षांपूर्वी पेड मुंबई गाडी सुरू होती ती काही तांत्रिक कारणास्तव बंद करण्यात आली होती यामुळं या भागातील सर्वसामान्य लोकांना सातारा, पुणे अथवा मुंबईला जायचं असल्यास मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. एकतर लोकांना विट्याला अथवा कडेगाव ला जायला लागायचं. या भागातून मागील काही दिवसात बऱ्याच गाड्या सुरू करण्यात आल्या मात्र त्या काही काळातच बंद करण्यात आल्या. आता ह्या गाडीचा भागातील नोकरदार, सर्वसामान्य लोकांनी लाभ घ्यायचा आहे.यावेळी एसटी चे वाहक व चालक यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला व प्रवाश्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी प्रभाकर बाबा महाडीक ,धनाजी महाडीक, हणमंत भोसले, संजय कोरे, अमोल पवार, गणेश ठोंबरे, जीतेंद्र महाडीक, शंकर पवार ,सुरज पाटील यांचे सह ग्रामस्थ उपस्थित होते.फोटो ओळ:- नेवरी येथे तासगाव मुंबई एस टी चे स्वागत करताना संजय विभूते, मोहन सूर्यवंशी, जगदीश महाडीक ,किरण चव्हाण व इतर)