आँटोने दिली बंदची हाक….कशासाठी

0
717
Google search engine
Google search engine

शेगांव:- आज शेगावतील ऑटो,पायदलरीक्षा व टांगा चालक व मालकांनी आज बंद पुकारला आहे, कारण असे की श्री संत गजानन महाराज संस्थानने भक्तांसाठी, लहान मुलांसाठी उभारलेले एक पर्यटनस्थळ म्हणजे आनंद सागर ! हे स्थळ म्हणजे विदर्भाची शान आहे. या ठिकाणी महाराष्ट्रतुनच नव्हे तर देशभरातून भावीकभक्त तसेच पर्यटक मोठया प्रमाणात भेट देतात, या पर्यटक स्थळामूळे येथील स्थानिक ऑटोरिक्षा, पायदलरीक्षा, टांगा असो किंवा लहान मोठे व्यवसायिक असो याचा दैनंदिन उदरनिर्वाह होत होता. परंतु काही महिन्यापासून आनंद सागर बंद झाले आहे, होणार आहे अशी चर्चा सोशल मीडियाच्या माध्यमाद्वारे रंगत होती परंतु त्याचा वेळ बदलला होता काही दिवस असे सुरू राहीले परंतु आता मात्र आनंद सागर पूर्ण बंद होईल असे दिसू लागले त्यामुळे गावातील ऑटोरिक्षा, टांगेवाले यांनी आज बंद पुकारला आहे व आनंद सागर हे पूर्वी प्रमाणे सुरू व्हावे यासाठी तहसील कार्यालयात जाऊन विनंती पूर्वक निवेदन दिले आहे तर आमचे म्हणणे शासन दरबारी पोचवावे अशी विनंती तहसीलदारांना केली.
हा बंद ते शांततेच्या मार्गाने सुरू असून जर कुणाला दवाखान्यात जण्यासाठी ऑटो लागण्यास त्यांनी संपर्क साधावा असे काही नागरिकांना आव्हाहन दिले आहे त्यासाठी त्यांनी काही नंबर दिले आहेत ऑटोचालक आज विनामूल्य सेवा देणार आहेत. तर एकीकडे विद्यार्थीची बस, ऑटो सुरू असून आम्हाला हा बंद शांततेच्या मार्गाने करायचा आहे असे त्यांनी जाहीर केले आहेत.
आज संध्याकाळी गांधी चौक या ठिकणी संपाची सांगता होणार आहे