खरंच असे लोकप्रतिनिधी परत निवडून द्यावेत का?

0
293
Google search engine
Google search engine

खरंच असे लोकप्रतिनिधी परत निवडून द्यावेत का?

बुलढाणा:- बुलढाणा जिल्हा मध्ये अनेक पर्यटन स्थळे, देवालय, शित हवेचे ठिकाण(hill station) आणि इतर सुंदर गोष्टी आहेत. त्यामध्ये स्वतः बुलढाणा हे जिल्ह्याचे ठिकाण असून नैसर्गिक दृष्टिकोनातून अतिशय उत्तम थंड असे ठिकाण असून इंग्रज कालीन ही जिल्ह्याची राजधानी सुद्धा होती तर जिल्ह्यामध्ये जगप्रसिद्ध लोणार सरोवर आहे याकडे सुद्धा जनप्रतिनिधींचे दुर्लक्ष असून एवढेच नव्हे तर ज्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली असे छत्रपती शिवाजी महाराज त्यांची आई जिजाऊंचे सुद्धा येथे जन्मस्थळ आहे साडेचारशे वर्षापासून चा इतिहास सिंदखेड राजाला असून अनेक राजनीतिक लोकांनी फक्त मतदान करिताच तिथला उपयोग केला.विदर्भाची पंढरी श्री श्रेष्ठ संत गजानन महाराज मंदिर शेगाव, प्रसिद्ध असलेले मोठा बालाजी मंदिर, जाईचा देव अशा अनेक देऊळ आहेत. आशा विविधतेने नटलेला आमचा जिल्हा परंतु खरंच हा संपूर्ण १३ तालुक्यासह असलेला बुलढाणा जिल्हा या तालुक्यांमध्ये खरंच विकासाची कामे प्रत्येक तालुक्यात व तालुक्यातील ग्राम मध्ये विकास झालेला आहे का? जर खरच विकास कामे झालेली आहेत तर ती किती प्रमाणात आहेत असा मोठा प्रश्न जनतेसमोर दिसत आहे. बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे खासदार प्रतापराव जाधव यांच्या लोकसभा क्षेत्रात ११ तालुके येतात. मागील १५ वर्षात कोणकोणते महत्वाची विकास कामे इथे दिसून आली का? खरं सांगायचे झाले तर जळगाव जामोद मतदारसंघातील तालुक्यात असं मोठं कुठलं ही काम दिसून आले नाही म्हणजे कुठलीही एमआयडीसी नाही कुठलाही मोठे प्रोजेक्ट नाहीत सोबतच मोठ्या प्रमाणात रखडलेली कामे ती आजा ही जशीच्या तशीच आहेत यामध्ये सर्वात महत्त्वाचा म्हणजे जिगाव प्रकल्प मागील कित्येक वर्षा पासून रखडलेला आहे एवढेच काय विदर्भात पांढरे सोने पिकत असं म्हणतात म्हणजेच कापूस परंतु या कापसाच्या प्रक्रियेच्या सूतगिरण्या मात्र मराठवाड्यात वावं. रेल्वे मार्गाचे काम आता काहीतरी होताना दिसत आहे म्हणजे मागील १५ वर्षात फक्त एकच काम मार्गी लावण्याची लोकसभेचे प्रतिनिधी यांनी केलेले येथे दिसते. सोबत जिल्ह्यातील तालुक्यामधील बस स्थानकाची परिस्थिती खूपच बिकट आहे आता तर राज्य शासनाने महिलांना 50% प्रवासामध्ये सूट दिली परंतु सुविधा देण्यात सरकार अपुरे राहिलेत यामुळे होत असलेले जनतेचे हाल यावर थोडे लक्ष देणे किंवा विचारपूस करणे हे जिल्ह्याच्या राजाचे काम असते एवढेच नाही आता काही महिन्यापूर्व MPSC मध्ये उत्तीर्ण झालेल्या मुलांना आतापर्यंत रुजू करण्यात आलेले नाहीत. आज उपोषण करीत आहेत याबद्दल काही विचारपूस केली आहे का? मग या व्यतिरिक्त कुठल्याच मोठे काम या प्रतिनिधींनी जनतेला दिलेच नाही असे दिसून येत आहे.एवढेच नाही मागील पाच वर्षात यांनी कुठली पत्रकार परिषद किंवा कुठल्या लहान मोठा तालुक्याला भेट सुद्धा दिली नाही असे विचारना केली असता भाषणांमधून इतर लोकप्रतिनिधी सांगताना दिसतात की खासदाराचे नेमकी कामे काय आहे परंतु आजा जनता ही सुज्ञ झालेली आहे ज्या ऑनलाईन पद्धतीचा वापर करण्यासाठी सरकार आपल्याला सांगते तिथेच या सर्वांना सगळं माहिती पडते की खासदार, आमदार, नगराध्यक्ष, नगरसेवक, सरपंच, यांची कामे काय आहेत असो.
जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांसाठी काय नवीन सुविधा केली असावीत काय त्यांना फक्त कर्ज वाटप किंवा नैसर्गिक आपत्तीचे पैसे मिळवून देणे यापूर्वीच मर्यादित राहिलेल्या आहे परंतु खासदारांनी कधी शेतकऱ्यांची तहसीलदार, बिडीओ किंवा जिल्हाधिकारी पर्यंत गेलेली अर्जाची पडताळणी केली आहे का? त्यांची समस्या जाणून घेतली आहे का?काही शेतकऱ्यांना स्वतः शेतात जाण्यासाठी रस्ता नाही पक्का तर सोडाच कच्चा सुद्धा नाही अशा भूमिपुत्रांची अर्ज कार्यालय मध्ये तशी धूळ खात पडलेली आहे. परंतु त्यावर कुणी लक्ष द्यायला तयार नाही आपण फक्त वर्षाच्या शेवटी म्हणजेच निवडणुकीच्या तोंडावर लोकांना समोर येता काही रस्त्यांना निधी देणे, काही सभामंडप निधी देणे, तर काही समाजाचे मंगल कार्यालय बांधण्यासाठी निधी. परंतु आजपर्यंत शेतकऱ्यांच्या गाड रस्त्यांच्या किंवा खराब परिस्थिती असलेल्या रस्त्यांसाठी किती निधी मिळाला व त्याचा उपयोग घेऊन किती शेतकऱ्यांचे रस्ते दुरुस्त करण्यात आले? शासनाकडून मिळणाऱ्या सुविधा चा लाभ त्यांना मिळत आहे की नाही की त्यामध्येही भ्रष्टाचार होत आहे? सोबतच आपण दिलेल्या खासदार निधीमधून झालेली कामे ही उत्कृष्ट दर्जाची झाली आहेत हे पाहणे महत्त्वाचे ठरते.
अशा विविध प्रश्नांसाठी सर्व प्रश्नांसाठी जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये आमचे प्रतिनिधीनी लोकांची चर्चा करताना काही काही प्रश्नांची उत्तर मिळालीत. येथे असे दिसून आले की खासदार प्रतापराव जाधव यांच्या बद्दल जनतेमध्ये किती नाराजी आहे. कारण विकासाचा अभाव आम्ही खासदारांना आजपर्यंत पाहिले नाही फक्त वाढदिवस आणि उद्घाटनाचे बॅनरवर फोटोमध्ये जे दिसले हेच आमचे खासदार… एवढेच आम्हास माहित त्यांच्या कामाबद्दल माहिती घेत असताना कुठे आहे काम?शेगाव, खामगाव, संग्रामपूर तालुक्यातील आजही काही ग्रामीण भाग अशी आहेत की मागील ७० वर्षांपासून आणि हो महायुतीच्या या दहा वर्षात ही तिथे कुठलाच विकास पोहोचलेला नाही ही शोकांतिका म्हणावी लागेल याचप्रमाणे काही भागात आजही पिण्याच्या पाण्याची समस्या दिसून येते चिखली असो किंवा इतर तालुके असो आज इथं पिण्याच्या पाण्याची कमतरता दिसून येत आहे.
यानंतर वैद्यकीय क्षेत्रामध्ये तीच परिस्थिती आहे खामगाव, शेगाव, संग्रामपूर, जळगाव जामोद, चिखली, लोणार,देऊळगाव राजा या तालुक्याची वैद्यकीय स्थिती पाहता काही प्रमाणात ठीक दिसते परंतु बहुतांश ठिकाणी लाखो रुपयाचे इन्स्ट्रुमेंट आहेत परंतु त्यांना चाविण्या करीत ऑपरेटर नाही. किंवा त्याची आतापर्यंत भरती सुद्धा करण्यात आलेली नाही स्वच्छता सोडली तर दुसरी कुठलीही सुविधा येथे दिसून येत नाही.
लोकसभेच्या प्रतिनिधी काय विकास काम केलीत? हा प्रश्न जनतेसमोर आहे आम्ही त्यांना याबद्दल काही प्रश्न विचारले असता त्यांची वेगवेगळी उत्तरे आम्हाला मिळाली की असा जनप्रतिनिधी परत निवडून द्यावा का? तर बहुतांश लोकांची उत्तरे अशी होती की नाही, पाहू,नको, चालतो, अशी होती तर मागच्या वेळेला पंतप्रधानांना निवडून द्यायचे होते म्हणून इच्छा नसताना सुद्धा आपला मतदानाचा अधिकार बजावला आतापर्यंत भारत देशाचे पंतप्रधान हे खासदार निवडून द्यायचे म्हणजेच ज्याचे खासदार जास्त त्यांचा पंतप्रधान परंतु मागील निवडणुकीमध्ये पंतप्रधानांनी खासदार निवडून दिले हे महत्त्वाचं परंतु यावेळेस आपल्या केलेल्या विकास कामाचे कर्तुत्वाचे व जनतेच्या समस्याला ज्यांनी खरा न्याय दिला अशा. प्रतिनिधी स्वतःच्या कर्तुत्वावर निवडून येतील की पंतप्रधानांच्या नावाखाली निवडून येईल हे पाहणे गरजेचे आहे. म्हणून असं म्हणावं लागत असे प्रतिनिधी जनता परत निवडून देतील का?