श्री सजल विहीर श्री क्षेत्र अकोली जहाँ.येथे संत श्री वासुदेव महाराज पायदळ दिंडीं प्रस्थान

0
804
Google search engine
Google search engine

सद् गुरु श्री गजानन -श्री भास्कर महाराजांच्या जयघोषाने दुमदुमली पंढरी
————————-
आकोट
सद्गुरु श्री गजानन प्रगट दिना निमित्त ‘श्री’ सजल विहीर तिर्थस्थळी अकोली जहागीर येथे प्रगट दिनाचे सोहळ्यात सहभागी होण्यासाठी श्री संत वासुदेव महाराज पालखी रथाचे दि.२४ ला भावपूर्ण प्रस्थान झाले. या पायदळ वारीत हजारो गजानन भक्त सहभागी झालेत.श्री गजानन-भास्कर महाराज यांच्या जयघोषाने सारा परिसर दुमदुमून गेला.
श्री क्षेत्र श्रद्धासागर ते अकोली जहागीर पायदळ दिंडीला स.८वा प्रारंभ झाला.येथे श्रींच्या पालखी रथाचे पुजन संस्थाध्यक्ष ह भ प वासुदेवराव महल्ले यांनी पुजन केले यावेळी संस्थेचे विश्वस्त उपस्थित होते.

ह.भ.प.अंबादास महाराज यांचे नेतृत्वाखाली या पायदळ वारी गांवोगांवचे वारकरी गजानन भक्त पताका खांद्यावर घेवून सहभागी झालेत.टाळ मृदंगाचे स्वरात अभंग गात भक्ती रंगात धुंद झाले होते.जय गजाननाचे जयघोषाने वातावरण भक्तीमय झाले होते. दिंडीचे नंदीपेठ,सोमवार वेस,यात्राचौक,गुरुमाऊली निवासस्थान,कबुतरी मैदान,गजाननन मंदीर मार्गावर ठिकठीकाणी श्रींचे भावपूर्ण स्वागत करण्यात आलेग.भाविकांनी श्रीं च्या पालखीचे मनोभावे दर्शन घेतले.तर वासुदेव नगर, हनुमान मंदीर कबुतरी मैदान,गजानन मंदीर ,अंजनगांव रोड येथे लोकजागर मंचाकडून चहा पाणी,शरबत नास्त्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती.

पालखी दिंडीचा वाई फाट्यावर भोजनावकाश झाला येथे ह भ प गणेशराव ठाकरे व बंडू पाटील ठाकरे यांनी स्वागत केले.महाप्रसादानंतर अल्पसा विश्राम घेवून अकोली येथे दिंडी पोहोचली .ह.भ.प.वासुदेवराव महल्ले यांचे मळ्यात चहापान घेवून दिंडी श्रींच्या प्रगटदिन सोहळ्यात सहभागी झाले.असे संस्थानच्या वतीने कळवण्यात आले.