जेसी आय अकोट जेसीरेटविंग द्वारा एक दिवस माजी सैनिकां सोबत उपक्रम

0
722
Google search engine
Google search engine

आकोट/ता.प्रतीनीधी
जेसी आय आकोटच्या जेसीरेटविंग महिलांनी
अत्यंत वेगळा उपक्रम राबवत एक दिवस माजी सैनिकांन सोबत हा प्रकल्प राबवला. सैनिकांच्या जीवनातील अमूल्य अश्या कार्याचं कौतुक करण्यात आले व त्यांना गौरव चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले .
उपक्रमाअंतर्गत सर्व जेसीरेट महिला अकोट मधील माजी सैनिकांच्या घरोघरी जाऊन त्यांची प्रत्यक्ष मुलाखत घेतली. व त्यांची सैन्यातील कार्या चे प्रत्येक्ष अनुभव तेथील शिस्त कठीण प्रसंग या सर्व गोष्टींवर चर्चा केली.
यामध्ये रामकृष्णजी गणोरकार
,रामजी बाळे, प्रविण वाघ , विजयकुमार आसलकर , अनिल आप्पा गोंडागरे सुरेंद्रजी फरकाडे यासर्व माजी सैनीकांसोबत त्यांच्या सैन्य सेवेतील अनुभवावर चर्चा करण्यात आली.

उपक्रमात जेसी आय च्या सर्व महिला वर्ग रेटविंग चेअरपर्सन दिपाली विनोदराव कडु प्रथम महिला जेसीरेट ममता हाडोळे, ममता टावरी, स्वाती वासे, राजश्री बाळे ह्या पास्ट चेअरपर्सन यांचा सहभाग लाभला.
तसेच जेसी आय महिला प्रकल्प प्रमुख जेसीरेट छायाताई शेळके ,संगिता सुने, माया इंगळे, मंगला गणोरकार,अरुणा खोडके, शुभांगी पिंपळे, या सर्व महिलांचा सहभाग होता. सचिव वैशाली शेगोकार यांनी सर्वांनचे आभार मानले. असे जेसीआयच्या वतीने कळविण्यात आले आहे.