तलवार घेऊन फिरणाऱ्या आरोपीच्या संभाजीनगर पोलिसांनी आवळल्या मुस्क्या

216

बीड:

नितीन ढाकणे, दिपक गित्ते

काल दिनांक 16 /3 /2019 रोजी
मा. पोलीस अधीक्षक बीड यांच्या आदेशाने पोलीस स्टेशन संभाजीनगर हद्दीत मिळालेल्या गुप्त बातमीनुसार पोलीस नाईक सानप यांना माहिती मिळाली की एक इसम हा पद्मावती गल्ली परळी वैजनाथ येथे संशयितरित्या तलवार घेऊन फिरत आहे. अशी माहिती मिळाल्यावरून त्यांनी सदर माहिती पोलीस निरीक्षक श्री बाळासाहेब पवार यांना सांगितली त्यावेळी त्यांनी पोलीस ना.आचार्य व पोलीस ना. सानप यांना कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या व सदर बाब मा.वरिष्ठांच्या निदर्शनास आणून देऊन तलवार बाळगणाऱ्या इसमाचा शोध घेतला त्यावेळी पोलिसांना पाहून तो आरोपी पळ काढू लागला तेव्हा पोलिसांनी त्याचा पाठलाग करून पद्मावती गल्ली परळी वैजनाथ येथे त्याला पकडले व त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव धनराज उर्फ किरण संजय व्हावळे वय 30 वर्ष राहणार भिमवाडी असे सांगितले सदर आरोपीस ताब्यात घेऊन त्याच्यावर पोलीस ठाणे संभाजीनगर परळी वैजनाथ येथे गु/नं 77/ 2019 कलम-4/ 25 भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे व तो सध्या पोलीस कोठडीत आहे.
सदरच्या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
पोलिसांनी मोठा अनर्थ होण्याच्या आधीच आरोपीस ताब्यात घेतले.
सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक जी.श्रीधर बीड मा. अ. पोलीस अधीक्षक अजित बोराडे माननीय उप. विभागीय पोलीस अधिकारी सुरेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार पोलीस ह. रवी पवार पोलीस ना.विष्णु सानप पोलीस ना. बाबासाहेब आचार्य पोलीस ना.देशमुख यांनी पार पाडली . पोलिसांनी केलेल्या जलद कारवाईबद्दल नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।